वसंत मोरेंचं ठरलं?; ‘या’ पक्षात जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vasant More । वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला राम राम केला आहे. मनसेतून वसंत मोरे (Vasant More) यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना पुण्यातून उमेदवारी देणार असल्याची शक्यता आहे. यामुळे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला राम राम करत पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे वसंत मोरे शरद पवारांसोबत जाणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत होता.

पुण्यातून महाविकास आघाडी विजयी होणार आहे. केवळ पुणेच नाहीतर राज्यामध्ये महाविकास आघाडी विजयी होणार असल्याचं वक्तव्य वसंत मोरे (Vasant More) यांनी केलं. यामुळे वसंत मोरे हे आता महाविकास आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

त्यानंतर मी लंगोट लावून आखाड्यामध्ये उतरलो आहे. फक्त मला कुठे आणि कसा डाव टाकायचा यासाठी मी तयारीत आहे, असं देखील वसंत मोरे म्हणाले आहेत. वसंत मोरे यांच्या वक्तव्याने मोरे महाविकास आघाडीमध्ये जाणार असल्याची चिन्हे आहेत. तसेच पुण्यातून महाविकास आघाडीची दुसरी यादी जाहीर होईल, असं देखील ते म्हणाले आहेत. वसंत मोरे यांच्या वक्तव्याने मोरे यांना महाविकास आघाडीतून लोकसभेचं तिकीट देण्याची दाट शक्यता आहे.

“मला भाजपला चितपट करायचंय”

“मी लंगोट बांधून आखाड्यात आलो आहे. फक्त मला कोणत्या दिशेने डाव टाकायचा आहे, हे मी ठरवेल. मला शंभऱ टक्के भाजपला चितपट करायचं आहे.” अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली आहे. “मला वाटतं की महाविकास आघडीच्या दुसऱ्या यादीमध्ये पुण्याच्या यादीचा विचार केला जाऊ शकतो” अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

त्यानंतर वसंत मोरे यांना मनसे पक्षाबाबत विचारण्यात आलं, त्यावेळी वसंत मोरे उत्तरले म्हणाले, मला त्याबद्दल माहिती नाही. मनसे पक्ष संघटना, पक्षाच्या नेत्यांना त्याबाबत विचारावं, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

“ते 4 जूनला तुम्हाला कळेल”

“मी घेतलेला निर्णय योग्य कसा आहे? आणि योग्य का आहे? ते 4 जूनला तुम्हाला कळेल. लोकसभा निवडणुकीचा 4 जूनला निकाल आहे. हा निकाल सांगेल की वसंत मोरे यांनी घेतलेली भूमिका योग्य होती की चूक”, असं वसंत मोरे यांनी म्हटलंय.

News Title – Vasant More Will Enter In Mahavikas aghadi?

महत्त्वाच्या बातम्या

भाजपकडून पुण्यात आचारसंहितेचा भंग, रविंद्र धंगेकरांच्या आरोपांनी खळबळ

“सुशांत सिंहसोबत जे घडलं तेच माझ्यासोबत घडलं”, अभिनेत्याचा गंभीर आरोप

राज ठाकरेंना शरद पवार गटाची खुली ऑफर!

आमलकी एकादशीचा दिवस ‘या’ 3 राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार!

मोठी बातमी! अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीच्या दाव्याने खळबळ