Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या जागावाटप संदर्भात सर्वच पक्षांचा फॉर्म्युला ठरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अबकी बार 400 पार’ अशी घोषणा दिली आहे. याला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीला मनसेच्या इंजिनाचीही साथ मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या भेटीमुळे या चर्चा अजून होत आहेत.
राज ठाकरे अमित शाह यांची भेट
आता राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं, त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत जाणून घेण्यास सर्वच उत्सुक आहेत. मनसेनं दोन जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवला होता. मात्र, दोन जागा देणं शक्य नाही, केवळ एकच जागा देणं शक्य असल्याचं अमित शहांनी भेटीदरम्यान राज ठाकरेंना (Raj Thackeray) स्पष्ट सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र अमित ठाकरेही उपस्थित होते. तर अमित शाह यांच्यासह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.
आज केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली. pic.twitter.com/8XMIEXydYq
— Raj Thackeray (@RajThackeray) March 19, 2024
मनसेचा महायुतीत जागेचा फॉर्म्युला ठरला?
या भेटीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंसोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू विधानसभेचं विधानसभेला ठरवू, असं अमित शाह यांनी म्हटलं असल्याची माहिती आहे.
मनसेसाठी मुंबईतील एक जागा निश्चित आहे. मात्र, दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहांनी राज ठाकरेंना स्पष्ट सांगितलं असल्याचं म्हटलं जातंय. तसंच विधानसभेत किती जागा किंवा कसा फॉर्म्युला असेल?, याबाबत अद्याप कोणतीच चर्चा झाली नाही. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अमित शहांसोबतच्या बैठकीवर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
News Title- What happened in Raj Thackeray meeting with Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या –
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय!
पोलिसांचा मनोज जरांगेंना मोठा धक्का!
वसंत मोरेंचं ठरलं?; ‘या’ पक्षात जाणार?
ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर
चाहत्यांची चिंता वाढली, प्रेग्नंट दीपिका पादुकोणने घेतला मोठा निर्णय