अमोल कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?; दिलीप वळसेंच्या बंगल्यावर खलबतं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shirur lok sabha | शिरूर मतदारसंघातून (Shirur lok sabha) राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यामान खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटातून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. अशातच आता अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये कोणता उमेदवार लढणार याबाबतची माहिती गुलदस्त्यामध्ये होती. मात्र आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर बैठक

अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये आढळराव पाटील यांना शिरूर मतदारसंघामधून लोकसभेचं (Shirur lok sabha) तिकीट देण्यावर अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर शिरूर मतदारसंघाबाबत राजकीय खलबतं आहे.

नाना पाटेकर यांचा लोकसभा निवडणुकीसाठी नकार

अभिनेते नाना पाटेकर यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये निवडणुकीसाठी अजित पवार यांनी ऑफर दिली होती, मात्र नाना पाटेकर यांनी ही ऑफर धुडकावली आहे. नाना पाटेकर यांनी शिरूरमधून (Shirur lok sabha) अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवावी अशी अजित पवार यांची अपेक्षा होती, मात्र नाना पाटेकर यांनी यावर कोणतंही पाऊल उचललं नाही. यामुळे आता ही जागा आढळराव पाटील यांना देण्यात येणार आहे. (Shirur lok sabha)

आढळराव पाटील यांच्यावर शिक्कामोर्तब? अजित पवार म्हणाले…

आढळराव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते आता आमदारांच्या कामामध्ये अडथळा आणणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. शिरूरमध्ये आढळरावच असतील असं अजित पवार यांनी थेटच सांगितलं आहे. शिरूर मतदारसंघ हा अजित पवार गटाला सोडण्यात आला. आढळराव हे शिवसेनेचे नेते असून ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असा अंदाज आहे.

अमोल कोल्हे यांना शिरूर मतदारसंघातून पाडणार म्हणजेच पाडणार असं चॅलेंज अजित पवार यांनी दिलं होतं. यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आणि अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी पुन्हा एकदा आढळराव यांना संधी देण्यात आली आहे.

आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिरूर मतदारसंघातील मतदार कोणाला मत देऊन विजयी करणार हे पाहणं गरजेचं असणार आहे.

News Title – Shirur lok sabha Election Amol Kolhe And Adharav Patil

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांना मोठा झटका; एका ओळीचं पत्र लिहीत ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

बच्चन कुटुंबात पुन्हा वाद?; सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

राज ठाकरे अमित शहांच्या भेटीत काय ठरलं?, मोठी माहिती समोर

रस्त्यावर नमाज पठण करण्याबाबत जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय!