रोहितला मिठी मारायची नव्हती पण…; अखेर हार्दिक आणि हिटमॅनची गळाभेट, पाहा Video

Rohit Sharma And Hardik | आयपीएलचा आगामी हंगाम मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी खास तितकाच उद्विग्न करणारा असेल यात शंका नाही. कारण फ्रँचायझीने रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून हार्दिक पांड्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. हिटमॅनच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. पण, रोहितला अचानक कर्णधारपदावरून काढल्यानंतर चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यानंतर दोघांमधील संबंध बिघडल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

दोन्ही स्टार खेळाडूंच्या चाहत्यांनी फ्रँचायझीवर टीका करण्यास सुरुवात केली. पण या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकणारा एक व्हिडीओ फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सराव सत्रात हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यात गळाभेट झाली. दोन्ही खेळाडूंच्या ऑन-फिल्ड ब्रोमान्सने या वादाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

मुंबईने शेअर केला व्हिडीओ

मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांची गळाभेट झाली. सध्या सोशल मीडियावर फक्त पांड्या आणि रोहितचा ब्रोमान्स ट्रेंड करत आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या ट्रेनिंग सत्रातील आहे.

मुंबईने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, एमआयचे सर्व खेळाडू असल्याचे पाहायला मिळते. रोहित आणि हार्दिकही दिसत आहेत. रोहितला पाहताच पांड्या त्याला भेटायला जातो. रोहितला आधी हस्तांदोलन करायचे होते पण पांड्याने त्याला थेट मिठी मारली. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा होत्या, ज्यावर या व्हिडीओच्या माध्यमातून पडदा पडल्याचे दिसते. आयपीएलचा सतरावा हंगाम शुक्रवारपासून सुरू होत आहे.

 

Rohit Sharma And Hardik गळाभेट

हार्दिक पांड्या आणि रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेदरम्यान पदार्पण केलेल्या खेळाडूंचे कौतुक केले आणि सांगितले की, या युवा क्रिकेटपटूंसोबत खेळताना मला खूप आनंद झाला.

इंग्लडंविरूद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत वरिष्ठ खेळाडूंची अनुपस्थिती होती. विराट कोहलीसह काही अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, आकाश दीप आणि देवदत्त पडिक्कल या 5 युवा खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

News Title- Mumbai Indians shared a video of Rohit Sharma and Hardik Pandya hugging each other
महत्त्वाच्या बातम्या –

बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, अजित पवार-पंकजा मुंडे अडचणीत सापडणार?

मोठी बातमी! अभिनेेत्री राखी सावंतच्या अडचणीत वाढ

अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो तुफान व्हायरल

‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट

मनोज जरांगे पाटलांना दिलासा देणारी बातमी समोर!