“महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या”, राऊतांचं ते विधान अन् भाजपचा संताप!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | लोकसभा निवडणूक तोंडावर असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यभर फिरत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज सत्ताधाऱ्यांचा समाचार घेत आहेत. अलीकडेच राऊत यांनी औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला, त्याच राज्यात मोदींचा जन्म झाल, असे म्हणत सरकावर टीका केली. राऊत सातत्याने केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका करत आहेत.

बुलढाण्यातील सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, तर औरंगजेबाचा जन्म सध्याच्या गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये दाहोद एक ठिकाण आहे, जिथे पंतप्रधान मोदींचा जन्म झाला होता. औरंगजेबचा जन्मही तिथेच झाला होता.

भाजप-राऊत वाद चिघळला

तसेच औरंगजेबचा जिथे जन्म झाला तिथेच मोदींचा जन्म झाला त्यामुळेच अराजकतावादी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रात सरकत आहे. हे शिवसेना आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात आहे. मोदी आग कुठे आहे हे म्हणू नका, औरंगजेब आला आहे असे म्हणा… आम्ही त्यांना दफन करू हे नक्की, असे विधान संजय राऊत यांनी केले अन् वाद चिघळला.

संजय राऊतांच्या या विधानानंतर भाजपने देखील त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा महाराष्ट्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भाजपाने म्हटले की, मागे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या त्यातल्याच काही आज बरळल्या… ज्यांनी रामाचे अस्तित्व नाकारले, टिपू सुलतानच्या कबरी सजवल्या अशा हिंदूद्वेषी काँग्रेसच्या धुणीभांडी करणाऱ्या घरगड्याने तोंड सांभाळून बोलावे. हिंदुत्वावर गरळ ओकणाऱ्या मालकाला जाब विचारणे तर लांबच मात्र ‘तमाम हिंदू बांधवांनो’ म्हणायला देखील ज्यांची जीभ वळली नाही त्यांनी ‘अंथरूण पाहूनच पाय पसरावेत’.

 

Sanjay Raut यांचे ते विधान

बुलढाण्यातील एका सभेला संबोधित करताना संजय राऊतांनी एक वादग्रस्त विधान केले. “शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. मुघल सम्राट औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या शेजारच्या गावात झाला होता. अशा परिस्थितीत मोदी आणि औरंगजेब यांच्या विचारात साम्य आहे. त्याच विचाराने गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर आक्रमण होत आहे”, असे राऊतांनी म्हटले.

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही राऊत यांना प्रत्युत्तर दिले. अशा सर्व हल्ल्यांना देशातील जनता चोख प्रत्युत्तर देईल. विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींबद्दल जितका द्वेष दाखवतील तितके लोक त्यांच्यावर प्रेम करतील आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 जागांचा आकडा पार करण्यास मदत करतील, असे त्रिवेदी म्हणाले.

News Title- BJP has criticized MP Sanjay Raut after he compared Prime Minister Narendra Modi with Aurangzeb
महत्त्वाच्या बातम्या –

रोहितला मिठी मारायची नव्हती पण…; अखेर हार्दिक आणि हिटमॅनची गळाभेट, पाहा Video

“मध्यमवर्गीयांच्या फक्त 3 गरजा असतात त्या म्हणजे…”, पंतप्रधानांनी सांगितली मोदी गॅरंटी!

पैशासाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितले 30 लाख, केंद्रीय मंत्र्यानेही घेतली दखल

रूपाली चाकणकरांच्या बुद्धीचीच किव येते, कारण त्यांनी…”, जितेंद्र आव्हाड संतापले

बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, अजित पवार-पंकजा मुंडे अडचणीत सापडणार?