पैशासाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितले 30 लाख, केंद्रीय मंत्र्यानेही घेतली दखल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Madhya Pradesh | मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने पैशांसाठी आपल्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न केला. खरं तर तिने तिच्या मित्रांसह अपहरणाचा कट रचला. येथील तरूणीचा अज्ञातांनी फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवला अन् पैशांची मागणी केली. पण याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला असून एक वेगळीच माहिती समोर आली आहे. फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीने मुलीचे अपहरण झाल्याचा दावा केला होता. संबंधित तरूणी राजस्थानातील कोटा येथे राहून NEET ची तयारी करते.

अपहरण झालेल्या विद्यार्थिनीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात ती दोन मुलांसोबत जयपूर रेल्वे स्थानकाबाहेर जाताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जयपूरच्या दुर्गापूर रेल्वे स्थानकाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. 18 मार्चचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, आता कोटा पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शिवपुरी जिल्ह्यातील बैराड येथील विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याप्रकरणी मुलीचे घरचे चिंतेत होते.

वडिलांकडे मागितले 30 लाख

याप्रकरणी तरूणीच्या वडिलांनी कोटा येथील विज्ञान नगर पोलीस ठाण्यात आपल्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचे विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले. त्यांच्या व्हॉट्सॲपवर अपहरणाचा मेसेज आला होता, ज्यामध्ये अपहरणकर्त्यांनी 30 लाख रुपयांची मागणी केली होती.

याप्रकरणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एवढेच नाही तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पीडित मुलीच्या वडिलांशी फोनवर बोलून त्यांना आश्वासन दिले की, आता मुलीला परत आणण्याची जबाबदारी माझी आहे, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांनी तुमची काळजी घ्या. ती फक्त तुमची मुलगी नाही तर माझी देखील मुलगी आहे.

Madhya Pradesh मधील तरूणी

वडिलांच्या व्हॉट्सॲप नंबरवरून चोरट्यांनी अपहरणाची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मुलीचे हात, पाय व तोंड बांधलेल्या अवस्थेत फोटो देखील पाठवला. अपहरण झालेल्या विद्यार्थीनीच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी 30 लाख रुपयांची मागणी केली. मुलीचे वडील शिवपुरी जिल्ह्यातील बैराड पोलीस स्टेशन परिसरात राहतात. ते येथील शाळेचे संचालक आहेत. त्यांची मुलगी सप्टेंबर 2023 पासून कोटा येथे राहून NEET ची तयारी करत आहे.

विशेष बाब म्हणजे संबंधित विद्यार्थिनीने तिच्या मित्रांसोबत मिळून स्वतःच्या अपहरणाचा कट रचला होता. तिला परदेशात फिरायला जायचे होते. कोटा पोलिसांनी विद्यार्थिनीची माहिती देणाऱ्यास 20 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. याप्रकरणी पोलिसांनी इंदूरमधून एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही मुलगी कोटामधील कोणत्याही कोचिंग संस्थेची विद्यार्थिनी नाही.

News Title- A student who was preparing for NEET in Kota to go on a trip abroad conspired to kidnap her and demanded Rs 30 lakh from her father

महत्त्वाच्या बातम्या –

बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, अजित पवार-पंकजा मुंडे अडचणीत सापडणार?

मोठी बातमी! अभिनेेत्री राखी सावंतच्या अडचणीत वाढ

अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो तुफान व्हायरल

‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट

मनोज जरांगे पाटलांना दिलासा देणारी बातमी समोर!