RCB Logo | रॉयल चॅलेजर्स बंगळुरू (RCB Logo) आयपीएलमधील हा संघ गेल्या काही वर्षांपासून विजेतेपदापासून मुकत आहे. दरवर्षी बंगळूरूचे फॅन आशा लावून आयपीएलमधील आपल्या RCB संघाचे सामने पाहत असतात. आपला संघ एकदा तरी आयपीएलमध्ये जेतेपद मिळवेल, मात्र तसं अद्यापही झालं नाही. याउलट RCB च्या वुमन संघाने WPL मध्ये जेतेपद मिळवलं, यामुळे आता RCB सध्या WPL मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र आता आयपीएलमध्ये RCB पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
RCB संघाची जर्सी फ्रेंचायसीने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. जर्सीसोबत संघाचा लोगो (RCB Logo) देखील बदलण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये RCB आपल्या नवीन जर्सीसह मैदानामध्ये उतरणार आहे. (RCB Logo)
१) रॉयल चॅलेंजर्सच्या लोगोसह नावात बदल
RCB ने आपल्या जर्सीवर काळ्या रंगाऐवजी निळ्या रंगाचा वापर केला आहे. तसेच लोगोमध्येही बदल केला आहे. RCB चा पहिला सामना हा चेन्नई सुपरकिंग्ससोबत होणार आहे. तर संघाच्या नावामध्ये बदल झाला असल्याचं दिसतं. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ऐवजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असं नाव देण्यात आलं आहे. (RCB Logo)
आतापर्यंत लोगोत झालेला बदल
२) आतापर्यंत हा पाचवा बदल आहे. याआधी आयपीएलमध्ये चार वेळा लोगोमध्ये बदल करण्यात आला आहे. लोगोमध्ये सिंह दिसत आहे. आयपीएलची सुरूवात ही 2008 ला झाली. तेव्हा सिंहापेक्षा लोगोमध्ये नावाचा वापर केला होता. अर्थातच चिन्हापेक्षा नावाला प्रधान्य दिलं होतं.
३) आयपीएल पर्वाच्या दुसऱ्या वर्षी देखील रॉयर चॅलेजर्स बॅगलोरच्या लोगोमध्ये बदल करण्यात आला होता. यामध्ये लोगो जसाच्या तसा आहे. फक्त त्या लोगोच्या मागील भाग म्हणजेच बॅकग्राऊंड बदलण्यात आलं आहे. या लोगोचा वापर करत संघाने 7 सीजन खेळले होते.
४) 2016 ते 2019 या वर्षामध्ये लोगोमध्ये बदल करण्यात आला असून सिंहाला प्राधान्य दिलं गेलं. यामुळे लोगोमध्ये अधिकच आकर्षण निर्माण झालं होतं.
५) 2020 या वर्षामध्ये संघाच्या लोगोमध्ये सिंहाला अधिक प्राधान्य देण्यात आलं आहे. लोगोमध्ये सिंह अधिकरित्या कसा उठून दिसेल याकडे लक्ष होतं. संघ मागील वर्षात हाच लोगो वापरत मैदानात उतरला होता. मात्र यंदा मैदानात उतरण्याआधी त्यांच्या लोगोमध्ये पुन्हा एकदा म्हणजेच पाच वेळा बदल करण्यात आला आहे.
६) यंदाच्या लोगोमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. लोगोमध्ये RCB असं नाव देण्यात आलं आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर असं नाव होतं, आता त्या नावामध्ये बदल करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असं नाव देण्यात आलं आहे.
News Title – RCB Logo Change News Update
महत्त्वाच्या बातम्या
बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, अजित पवार-पंकजा मुंडे अडचणीत सापडणार?
मोठी बातमी! अभिनेेत्री राखी सावंतच्या अडचणीत वाढ
अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो तुफान व्हायरल
‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट