सस्पेन्स वाढला! वसंत मोरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vasant More | मनसेला रामराम ठोकल्यापासून वसंत मोरे चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचं म्हटलं जातंय. यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

या भेटीमुळे वसंत मोरे शरद पवार गटात जाणार का?, याबाबत बोललं जातंय. ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांच्या नजरा असतानाच त्यांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत अली आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहेत. अशात वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यानंतर हा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

वसंत मोरे यांची पोस्ट

वसंत मोरे (Vasant More) यांनी रात्री उशिरा शेअर केलेल्या पोस्टने चर्चांना उधाण आलं आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. ‘तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघोतच मी… ‘, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

या पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. याला असणारं बॅकग्राऊंड म्युझिक बरंच काही सुचवू पाहात आहे.’देखीये जी ये शहर है तुम्हारा लेकीन महोदयजी आपके इस शहर में दबदबा है हमारा…’, असं बॅकग्राऊंड म्युझिक असणारा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

वसंत मोरे मविआकडून लढणार?

वसंत मोरे यांनी 12 मार्चला मनसे पक्षाला राम राम केला. त्यानंतर त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. पुण्यातील कोअर कमिटी मनसे पक्षाला संपवण्याचं काम करतेय, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. आता ते कोणत्या पक्षात जाणार, याबाबत उत्सुकता लागली आहे.

पुण्यातून महाविकास आघाडी विजयी होणार आहे. केवळ पुणेच नाहीतर राज्यामध्ये महाविकास आघाडी विजयी होणार असल्याचं वक्तव्य वसंत मोरे (Vasant More) यांनी केलं. यामुळे वसंत मोरे हे आता महाविकास आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

News Title- Vasant More Facebook post in discussion

महत्त्वाच्या बातम्या –

“महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या”, राऊतांचं ते विधान अन् भाजपचा संताप!

रोहितला मिठी मारायची नव्हती पण…; अखेर हार्दिक आणि हिटमॅनची गळाभेट, पाहा Video

“मध्यमवर्गीयांच्या फक्त 3 गरजा असतात त्या म्हणजे…”, पंतप्रधानांनी सांगितली मोदी गॅरंटी!

पैशासाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितले 30 लाख, केंद्रीय मंत्र्यानेही घेतली दखल

रूपाली चाकणकरांच्या बुद्धीचीच किव येते, कारण त्यांनी…”, जितेंद्र आव्हाड संतापले