अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Parth Pawar | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये ट्वीस्ट निर्माण होताना दिसत आहेत. आपापले पक्ष आपापल्या नेत्यांना कार्यकर्त्यांवर विविध जबाबदाऱ्या देताना दिसतात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपले पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना मोठी जबाबदारी दिली आहे.

पार्थ पवार यांच्यावर जबाबदारी

गेल्या लोकसभेला पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीमध्ये पार्थ पवार (Parth Pawar) यांचा पराभव झाला होता. मात्र आता अजित पवार यांनी पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर पक्षांतर्गत निवडणुकीची जबाबदारी दिली आहे.

काही महिन्यांआधी पार्थ पवार हे पुण्यातील कोथरूड येथे मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पार्थ पवार यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या घरी जात भेट घेतली होती. यावेळी अजित पवार यांनी गजानन मारणेच्या भेटीवर पार्थ पवारांवर संताप व्यक्त केला होता.

पार्थ पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फूटीआधी पार्थ पवार शांत होते. मात्र पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पार्थ पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये आहेत. तर यामध्ये पार्थ पवार यांचा भाऊ जय पवार यांना देखील बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला हातभार लावला आहे.

जय पवार यांच्यावर बारामतीची जबाबदारी

जय पवार यांच्यावर बारामतीची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान पार्थ पवार यांना मागील मावळ लोकसभेमध्ये तिकीट देण्यात आलं असून पार्थ पवार हे विजयी झाले नाही. पार्थ पवार यांची ताकद कुठेतरी कमी पडली होती. तर पक्षाच्या राज्यसभेची जागा पार्थ पवार यांना दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र ती जागा प्रफुल्ल पटेल यांना दिल्याने पार्थ पवार यांना राज्यसभेची देखील जागा देण्यात आली नाही.

पार्थ पवार आणि जय पवार यांना लोकसभा मतदारसंघाबाबतची काम वाटून दिली असल्याने जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता, मात्र तसं काही नाही.

News Title – Parth Pawar New Responsibility In Baramati Lok sabha

महत्त्वाच्या बातम्या

गोळीबाराने पुणे हादरलं! गोळीबाराचं कारण ऐकून बसेल धक्का

“एकच आमदार असलेल्या पक्षासाठी भाजप..”, रोहित पवारांचा रोख कुणाकडे?

‘फडणवीसांनी मला पहाटे तीन वाजता…’; जरांगे पाटलांकडून मोठा गौप्यस्फोट

ए आर रहमानच्या तालावर चाहते नाचणार, IPL च्या मैदानात हे तारे रंगणार

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!; एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र