“एकच आमदार असलेल्या पक्षासाठी भाजप..”, रोहित पवारांचा रोख कुणाकडे?

Rohit Pawar | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीमध्ये जागावाटप संदर्भात बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच महायुतीमध्ये अजून एक पक्ष सामील होण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यापासून ते लवकरच महायुतीमध्ये जाणार, अशा चर्चा होत आहेत.

यावरूनच शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वांद्रे येथील हॉटेल ताज लँडमध्ये बैठक सुरू आहे. त्यामुळे मनसेचा महायुतीतील प्रवेश निश्चित झाल्याचंही मानलं जात आहे.

रोहित पवार यांची पोस्ट

आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजप आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे 40-40 आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही तर दुसरीकडे 1-1 आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरतोय.

असला शाही पाहुणचार बघून छोटे पक्ष मनातले मांडे खात असले तरी ‘उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे’ या भाजपच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात. असो! या छोट्या पक्षांकडे बघून अल्पावधीतच आधीच शिकार झालेले मोठे पक्ष ‘नया है वह’ असेच म्हणत असतील, असा टोला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लगावला आहे.

राज ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांची बैठक

दरम्यान, मनसे सोबत आल्यावर महायुतीचा कार्यक्रम कसा असेल हे ठरवलं जाणार आहे. त्यामुळे हॉटेल ताज लँडमध्ये होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मनसेने महायुतीकडे दोन जागांची मागणी केली आहे. शिर्डी किंवा नाशिक आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर मनसेने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांना या जागा दिल्या जातात का?, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

भाजपकडून सध्या महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे 28 जागा उरल्या आहेत. यापैकी काही जागा या भाजपच्या आहेत. तर उरलेल्या जागा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देण्यात येणार आहेत. यातूनच दोन जागा मनसेसाठी दिल्या जाणार असल्याची माहिती आहे.

News Title – Rohit Pawar indirectly targeted Raj Thackeray  

 महत्वाच्या बातम्या- 

‘…सुजल्याशिवाय सुधरणार नाहीत ही बेनी’, अभिनेते किरण मानेंचा महायुतीला टोला

बारामतीत युगेंद्र पवारांना अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी घेरलं!

उद्या होणार IPL 2024 हंगामाला सुरवात! पाहा 21 सामन्यांचे वेळापत्रक

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

पुणेकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा!