पुणेकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुण्यामधील कोंढवा येथे वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यातील नगरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचून घ्यावी. या भागात वाहतूक कोंडी होत असल्याने हे बदल करण्यात आले आहेत.

शीतल चौक, अशोका म्युझ सोसायटी, पारगेनगर व कौसरबाग येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने हे बदल केले आहेत. वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोंढवा येथे वाहतुकीमध्ये बदल

या वाहतूक बदलानुसार ज्योती हॉटेल चौकातून फकरी हिल चौक मार्गे कमेला, साळुंके विहार येथे जाणारी सर्व प्रकारची जड वाहतूक व पाण्याचे टँकर उजवीकडे वळविण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहने लुल्लानगर ब्रिजखालून यु-टर्न करून कमेला साळुंके विहाराकडे जातील.

तसंच ज्योती हॉटेल चौकातून डावीकडे वळून मेफेअर जंक्शन मार्गे पारगेनगरकडे जाणारी जड वाहतूक व पाण्याचे टँकर सरळ ज्योती हॉटेल आणि शितल चौक या पर्यायी मार्गाने पारगेनगर कडे जातील.

यासोबतच सर्वोदय जंक्शन चौक येथून कौसरबागेकडे जाणारी जड वाहतूक व पाण्याचे टँकरला बंदी करण्यात आली असून मेफेअर मार्गे ज्योती हॉटेलकडे पर्यायी मार्गाने ही वाहने जातील.

कोंढवा वाहतुक विभागाअंतर्गत जारी केलेले हे वाहतूक बदलाचे तात्पुरते आदेश पुढील आदेश येईपर्यंत जारी राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

News Title- Pune News Kondhwa traffic Changes

महत्त्वाच्या बातम्या –

RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; IPL आधी फ्रेंचायसीने घेतला महत्त्वाचा निर्णय

“महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या”, राऊतांचं ते विधान अन् भाजपचा संताप!

रोहितला मिठी मारायची नव्हती पण…; अखेर हार्दिक आणि हिटमॅनची गळाभेट, पाहा Video

“मध्यमवर्गीयांच्या फक्त 3 गरजा असतात त्या म्हणजे…”, पंतप्रधानांनी सांगितली मोदी गॅरंटी!

पैशासाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितले 30 लाख, केंद्रीय मंत्र्यानेही घेतली दखल