मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

Earthquake | राज्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रत रिश्टर स्केलवर 4.2 अशी नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिक भीतीने पळून घराबाहेर आले.

या घटनेमुळे नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत. 11 मिनिटं भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे अनेक घरांना तडे देखील गेले. हे धक्के नांदेड शहरासह हदगाव, नायगाव, अर्धापूर तालुक्यात बसले. हिंगोली जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के बसले. अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिक खूपच घाबरून गेले.

हिंगोलीजवळ भूकंपाचं केंद्र

हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ येथे आज (21 मार्च) सकाळी दोन वेळा भूकंपाचे हादरे बसले. पहाटे 6 वाजून 8 मिनिटांनी पहिला धक्का, तर 6 वाजून 19 मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला.

या भागातील सिरळी गावात भूकंपामुळे काही घराच्या भिंतींना तडे गेले. 4.2 रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची आर्थिक तसेच जीवित हानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

हिंगोली, नांदेड आणि परभणीत भूकंपाचे धक्के

या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली, परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील गावांना जाणवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच नांदेड शहर आणि काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. विवेकनगर, श्रीनगर, शिवाजीनगर भागात 1/5 रिष्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. आता पुन्हा भूकंपाचा हादरा बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

News Title- Earthquake in Nanded Hingoli and Parbhani

महत्त्वाच्या बातम्या –

“महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या”, राऊतांचं ते विधान अन् भाजपचा संताप!

रोहितला मिठी मारायची नव्हती पण…; अखेर हार्दिक आणि हिटमॅनची गळाभेट, पाहा Video

“मध्यमवर्गीयांच्या फक्त 3 गरजा असतात त्या म्हणजे…”, पंतप्रधानांनी सांगितली मोदी गॅरंटी!

पैशासाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितले 30 लाख, केंद्रीय मंत्र्यानेही घेतली दखल

रूपाली चाकणकरांच्या बुद्धीचीच किव येते, कारण त्यांनी…”, जितेंद्र आव्हाड संतापले