गोळीबाराने पुणे हादरलं! गोळीबाराचं कारण ऐकून बसेल धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुणे (Pune News) हे विद्येचं माहेरघर आहे. पुणे शहर (Pune News) हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जात. पुण्याला बाजीराव पेशव्यांचा इतिहास आहे. मात्र सध्या पुणे शहरामध्ये (Pune News) घडणाऱ्या घटना या देशाला आणि शहराला पिछाडीवर घेऊन जात आहेत.

आधी पुण्यामध्ये शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या, नंतर कोयता गँगच्या मास्टरमाईंडची गोळ्या घालून हत्या. यामुळे पुणे शहरातील (Pune News) कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. काही दिवसांआधी पुणे पोलिसांनी पुण्यातील कुख्यात गुंडांची क्लास घेतली होती. सर्व गुन्हेगार शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत उभे राहिले होते.

यावेळी पोलिसांनी त्यांना कोणताही गुन्हा करू नये. सोशल मीडियावर वातावरण बिघडेल अशा, पोस्ट रिल्स तयार करू नये अशी ताकीद देऊन ठेवली होती, तरीही पुण्यामध्ये गोळीबार सत्र सुरू आहे. या गोळीबार सत्राने पुणे हादरून गेलं असून पुणेकर भयभीत आहेत.

क्रिकेट खेळण्यावरून दोन गटामध्ये वाद

पुण्यातील कात्रज येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळण्यावरून दोन गटामध्ये वाद झाला. त्यावेळी गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराने पुण्यातील कात्रज परिसरामध्ये भयभीत वातावरण झालं आहे. गोळीबारामध्ये कोणीही जखमी नाही.

त्यानं पिस्तुल काढलं अन्…

कात्रज येथे क्रिकेट खेळत असताना दोन्ही गटामध्ये वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गट बुधवारी भेटले. त्यावेळी वाद मिटवत असताना झालं तिसरंच. वाद वाढत गेला. त्यातील एका मुलावर याआधी काही गुन्हे दाखल होते त्यानं पिस्तुल काढलं आणि समोरच्या मुलावर गोळीबार केला. त्यावेळी त्या मुलाला काही झालं नाही. मात्र त्यातील दोन मुलं जखमी आहेत.

गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरील परिसरामध्ये भयभीत वातावरण तयार झालं. याप्रकरणामध्ये काही तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – Pune News Firing At katraj

महत्त्वाच्या बातम्या

“महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या”, राऊतांचं ते विधान अन् भाजपचा संताप!

रोहितला मिठी मारायची नव्हती पण…; अखेर हार्दिक आणि हिटमॅनची गळाभेट, पाहा Video

“मध्यमवर्गीयांच्या फक्त 3 गरजा असतात त्या म्हणजे…”, पंतप्रधानांनी सांगितली मोदी गॅरंटी!

पैशासाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितले 30 लाख, केंद्रीय मंत्र्यानेही घेतली दखल

रूपाली चाकणकरांच्या बुद्धीचीच किव येते, कारण त्यांनी…”, जितेंद्र आव्हाड संतापले