Ruturaj Gaikwad CSK Captain | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी आली आहे. चेन्नई सुपर किंग्जने धक्कादायक निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. एम एस धोनीने चेन्नई सुपरकिंग्सच कर्णधारपद सोडल असून आता कर्णधार पदाची जबाबदारी मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शुक्रवारी गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल 2024 चा पहिला सामना रंगणार आहे. आयपीएल सुरु होण्यासाठी 1 दिवस शिल्लक असताना चेन्नई सुपरकिंग्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.
एमएस धोनीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आयपीएलच्या सुवर्णकाळाचाही अंत झाला असे त्याचे चाहते म्हणत आहेत. एमएस धोनी हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने एकूण पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली. त्यांचा संघ गेल्या मोसमात देखील चॅम्पियन बनला होता.
ऋतुराज गायकवाड हा सुरुवातीपासून चेन्नई सुपरकिंग्सच्या सोबत आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याने चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना 590 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याची सर्वोत्कृष्ट धाव संख्या ही 92 इतकी होती, तर त्याने 4 अर्धशतक ठोकले.
महत्त्वाच्या बातम्या-
गोळीबाराने पुणे हादरलं! गोळीबाराचं कारण ऐकून बसेल धक्का
“एकच आमदार असलेल्या पक्षासाठी भाजप..”, रोहित पवारांचा रोख कुणाकडे?
‘फडणवीसांनी मला पहाटे तीन वाजता…’; जरांगे पाटलांकडून मोठा गौप्यस्फोट
ए आर रहमानच्या तालावर चाहते नाचणार, IPL च्या मैदानात हे तारे रंगणार
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!; एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र