ए आर रहमानच्या तालावर चाहते नाचणार, IPL च्या मैदानात हे तारे रंगणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Opening Ceremony l ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) शुक्रवारपासून सुरू होत आहे. सर्व 10 संघांचे चाहते त्यांच्या संघाला पाठिंबा देण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. पहिल्याच दिवशी ए.आर. रहमानपासून ते अक्षय कुमारपर्यंत सर्वच जण आपला परफॉर्मन्स देणार असून एकप्रकारे मनोरंजनच होणार आहे. अशातच IPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. बॉलीवूड स्टार्स उद्घाटन सोहळ्यात रंगत वाढवताना दिसणार आहेत. चेपॉकमध्ये चाहते एआर रहमानच्या तालावर नाचताना दिसतील, तर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ परफॉर्मन्स करणार आहेत.

IPL 2024 Opening Ceremony l उद्घाटन सोहळा होणार धमाकेदार :

आयपीएल 2024 चा उद्घाटन सोहळा धमाकेदार होणार आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी चेपॉकमध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतील. प्रसिद्ध गायक ए आर रहमान आणि सोनू निगम आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांना नाचायला भाग पाडतील. त्याचवेळी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची जोडी स्टेजवर त्यांच्या डान्स मूव्ह्सने खळबळ माजवताना दिसणार आहेत.

उद्घाटन समारंभ किती वाजता सुरू होईल? :

इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. सुमारे अर्धा तास चालणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात हे चार तारे रंगतांना दिसणार आहेत. तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. त्याचवेळी तुम्ही Jio सिनेमावर त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य पाहू शकाल.

ब्लॉक ब्लास्टर पहिला सामना या दोन संघात होणार ?

आयपीएल 2024 ची सुरुवात अत्यंत स्फोटक सामन्याने होणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला घरच्या मैदानावर आव्हान देताना दिसणार आहे. दोन्ही संघांबद्दल बोलायचे झाले तर कागदावर आरसीबी प्रत्येक विभागात संतुलित दिसत आहे. त्याचवेळी सीएसकेचे गोलंदाजी आक्रमण थोडे कमजोर दिसत आहे. यासोबतच डेव्हॉन कॉनवे आणि पाथीरानाला झालेल्या दुखापतींमुळेही सीएसकेचा तणाव वाढला आहे.

News Title : IPL 2024 Opening Ceremony 

महत्त्वाच्या बातम्या –

डोळ्यांखाली Dark Circles दिसत आहेत? मग या घरगुती टिप्स फॉलो करा

आयपीएलमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर! पाहा टीमचे शिलेदार

‘शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील’; पवार कुटुंबातील व्यक्तीच्या वक्तव्याने खळबळ

“मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरे..”, भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

‘हे दुःख मी एकटी सहन करू शकत नाही’, अभिनेत्री कंगनाला बसला मोठा धक्का