‘शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील’; पवार कुटुंबातील व्यक्तीच्या वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Supriya Sule Or Sunetra Pawar | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. बारामती मतदासंघामध्ये पवार विरूद्ध पवार (Supriya Sule Or Sunetra Pawar) अशी लढत पाहायला मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एकमेकांपासून दूर झाले आहेत, अशी चर्चा आहे. यावर आता शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांना सुप्रिया सुळे जिंकणार की सुनेत्रा पवार? (Supriya Sule Or Sunetra Pawar) असा प्रश्न केला त्यावर सरोज पाटील यांनी उत्तर दिलंय. तसेच पवार कुटुंब अभेद्य असून भविष्यकाळात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. यापार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरूद्ध पवार लढत होणार आहे. यामध्ये कोण कोणावर भारी पडेल हे मतदारांच्या हाती असणार आहे. यावर शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांना माध्यमांनी यंदा बारामतीमध्ये सुप्रिया सुळे जिंकणार की सुनेत्रा पवार जिंकणार? (Supriya Sule Or Sunetra Pawar) असा प्रश्न केला. त्यावर सरोज पाटील म्हणाल्या की मी शिक्षिका आहे आणि माझं दोघींवर प्रेम आहे, असं सरोज पाटील यांनी म्हटलंय.  (Supriya Sule Or Sunetra Pawar)

पवार कुटुंबामध्ये उभी फूट पडली? सरोज पाटील म्हणाल्या

पवार कुटुंबामध्य़े उभी फूट पडली असल्याच्या चर्चा आहेत. दोघेही एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यावर आता शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. राजकारण हे घराच्या बाहेर चप्पलच्या जागी असतं, असं सरोज पाटील म्हणाल्या आहेत.

“एनडी पाटील आणि शरद पवार हे अत्यंत डावे उजवे लोक होते. पण त्यांनी कधीही राजकारण घरात आणलं नाही. एनडी पाटील राजाराम बापूंविरोधात उभे राहिले पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. यामुळे माझ्या आईने त्यावेळी दहा हजार रूपये दिले होते. राजकारण घरामध्ये आणलं नाही आम्ही एकाच ताटामध्ये जेवतो,” असं सरोज पाटील म्हणाल्या.

“शरद पवार यांचं बहीणीच्या ताटामध्ये आणि एनडी पाटील यांच्या ताटामध्ये लक्ष असायचं. एनडी यांनी अनेकदा शरद पवार यांच्यावर प्रखर टीका देखील केल्या होत्या. शरद पवार हे काँग्रेस तर आई शेकाप पक्षामध्ये होती. कधी कधी घरामध्ये यशवंतराव चव्हाणांसारखे लोकं देखील येत होती, पण त्याचा कधी घरावर परिणाम झाला नाही”, असं सरोज पाटील म्हणाल्या आहेत.

“अजित पवार संवेदनशील”

“अजित पवार काय बोलला? श्रीनिवास काय बोलला? हे केवळ राजकारणापुरतं आहे”. त्यानंतर ते अजित पवार यांच्याबद्दल म्हणाल्या, “अजित यांचा तोल कसा सुटला हे माहिती नाही. अजित पवार हे संवेदनशील आहे. कदाचित अजितला पश्चाताप झाला आहे”, असं देखील सरोज पाटील म्हणाल्या आहेत.

News Title – Supriya Sule Or Sunetra Pawar Who Will Win? Saroj Patil statement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची संधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु

‘…सुजल्याशिवाय सुधरणार नाहीत ही बेनी’, अभिनेते किरण मानेंचा महायुतीला टोला

बारामतीत युगेंद्र पवारांना अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी घेरलं!

उद्या होणार IPL 2024 हंगामाला सुरवात! पाहा 21 सामन्यांचे वेळापत्रक

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण