बारामतीत युगेंद्र पवारांना अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी घेरलं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok sabha | आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसा लोकसभा निवडणुकीत नवा ट्वीस्ट निर्माण होत आहे. अजित पवार यांच्या विरोधामध्ये बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये (Baramati Lok sabha) अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांचे पुत्र म्हणजेच अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार सक्रिय आहेत.

बारामती लोकसभेमध्ये (Baramati Lok sabha) युगेंद्र पवार हे गावोगावी जात प्रचार करत आहेत. त्यांनी अजित पवार यांच्या विरोधामध्ये अपप्रचार केला असल्याचा आरोप अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेरलं आहे. संबंधित घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok sabha) ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर युगेंद्र पवार आणि पवार कुटुंब आहे. यावेळी ग्रामीण भागातील मतदारांना युगेंद्र पवार भेटीगाठी देत आहेत. यावेळी अजित पवार यांच्या काही कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना अजित पवार यांची बदनामी का करत आहात? असा जाब विचारला. यावेळी युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्ती करून वाद मिटवला आणि युगेंद्र पवार तिथून निघून गेले. (Baramati Lok sabha)

अजित पवार यांचे बंधू आक्रमक

दोन दिवसांआधी अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार हे शरद पवार यांच्यासोबत प्रचार करत असून अजित पवार यांच्याविरोधात टीका करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांचा मुलगा युगेंद्र पवार देखील अजित यांच्या विरोधात सुप्रिया सुळे यांच्याकडून प्रचार करत गावोगावी जात भेटीगाठी देत आहेत.

दोन दिवसांआधी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि बहिण सई पवार यांनी देखील सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. अजित पवार यांच्या विरोधामध्ये पवार कुटुंब एकत्र येत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या पाठिशी उभे आहे.

बारामतीमध्ये नणंद आणि भाऊजय अशी लढत दिसणार आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार आहेत असं देखील सांगितलं नाही, मात्र सुनेत्रा पवार लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

News Title – Baramati Lok sabha In Ajit pawar’s Supporters Aggressive on Yugendra Pawar

महत्त्वाच्या बातम्या

अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो तूफान व्हायरल

‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट

मनोज जरांगे पाटलांना दिलासा देणारी बातमी समोर!

‘माझं धार्मिक स्थळांना भेट देणं…’; सारा अली खानने नेटकऱ्यांना सुनावलं

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा देश सोडणार?; ‘या’ देशात होणार शिफ्ट?