‘…सुजल्याशिवाय सुधरणार नाहीत ही बेनी’, अभिनेते किरण मानेंचा महायुतीला टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kiran Mane | अभिनेता किरण माने सतत काही न काही कारणांमुळे चर्चेत राहत असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे बऱ्याचदा ते राजकीय मत देखील मांडत असतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून ते आपले मत नोंदवत असतात.

आता त्यांनी फेसबुक पोस्ट करत महायुतीवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी शरद पवारांशी विभक्त होत भाजपचा हाथ धरला आहे. त्यामुळे सध्या राज्यात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट असं महायुतीचं सरकार सत्तेत आहे.

किरण माने यांचा महायुतीवर निशाणा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. बऱ्याच ठिकाणी उमेदवारीवरून त्यांच्यात विवाद होत असल्याचं दिसून येतंय. तीन पक्ष म्हटल्यावर उमेदवारीसाठी बरेच जन उत्सुक आहेत. बऱ्याच नेत्यांनी मनातली सलही यावेळी बोलून दाखवली आहे. त्यामुळे फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर उमेदवारी कुणाला द्यायची हा तिढा निर्माण झाला आहे.

या तिन्ही पक्षामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच असतानाच यात अजून एक पक्ष सामील होण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच मनसेचं इंजिनही आता महायुतीसोबत धावणार, अशी जोरदार चर्चा राजकारणात आहे. या पार्श्वभूमीवरच अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

किरण माने यांची पोस्ट

किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत महायुतीवर टीका केली आहे. “साताऱ्यात देवी चौकात, आधीच ट्रिपल सीट चाललेल्या पोरांनी चौथ्यालाही बाईकवर दाबून, खोचून बसवलं. नवा बघणारा एकजण म्हणाला, दुसरं काय नाही, ‘बॉन्डमस्ती’ हाय ही! आपटून ‘बॉन्ड’ सुजल्याशिवाय सुधारणार नाहीत ही बेनी.”, अशी पोस्ट किरण माने (Kiran Mane) यांनी केली आहे.

या पोस्टद्वारे किरण माने यांनी राज ठाकरे यांना तसंच महायुतीला टोला लगावला. दरम्यान, मनसेनं दोन जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवला होता. मात्र, दोन जागा देणं शक्य नाही, केवळ एकच जागा देणं शक्य असल्याचं अमित शहांनी भेटीदरम्यान राज ठाकरेंना (Raj Thackeray) स्पष्ट सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज ठाकरे अमित शहांसोबतच्या बैठकीवर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या महायुतीत सामील होण्याच्या सध्या जोरदार चर्चा आहेत.

News Title- Kiran Mane Target Mahayuthi Alliance

महत्त्वाच्या बातम्या –

पुणेकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा!

लाखाचा खेळाडू करोडोंवर भारी; रिंकू सिंहने मिचेल स्टार्कला दाखवलं आभाळ, पाहा व्हिडीओ

सस्पेन्स वाढला! वसंत मोरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण, म्हणाले…

RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; IPL आधी फ्रेंचायसीने घेतला महत्त्वाचा निर्णय

“महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या”, राऊतांचं ते विधान अन् भाजपचा संताप!