“मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरे..”, भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 मार्चरोजी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. तर, आज (21 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्यात वांद्रे येथील हॉटेल ताज लँडमध्ये बैठक सुरू आहे.

त्यामुळे मनसेचा महायुतीतील प्रवेश निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. अगोदरच उमेदवारीबाबत तिढा असताना मनसेही महायुतीमध्ये सामील होणार आहे. त्यामुळे राजकारणात याच्या चर्चा होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी संवाद साधत मनसेबाबत लवकरच कळवू, असं म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक वक्तव्य

त्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आज मोठं वक्तव्य केलं आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.ते म्हणाले की “आपल्या देशात हिंदुत्व टिकलं पाहिजे, हिंदुत्वाच्या विचारांवर देश आणि आपला महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. तसेच राज्याला आणि देशाला समृद्ध करण्यासाठी विकास झाला पाहिजे. यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नेहमीच भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांचा पक्ष हा भाजप आणि शिवसेनेच्या विचारांप्रमाणेच चालणारा असल्याने मला वाटतं की देशाच्या, राष्ट्राच्या कल्याणाकरता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरे यांनी काही विचार केला असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू.

आम्ही 51 टक्के लढाईसाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी जी सीट मिळेल ती जिंकण्यावर आमचा भर आहे. जागा किंवा पक्ष महत्वाचा नाही तर, आमच्या सर्वांचे एकत्रित असे मत आहे की, ज्यांच्याकडे उमेदवारी दिली जाईल ती जिंकण्यावर भर दिला जावा आणि सर्वांना योग्य पद्धतीने जागा वाटप केली जाईल. तसंच राज ठाकरे यांनाही योग्य स्थान दिलं जाईल”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

राज ठाकरे महायुतीत सामील होणार?

दरम्यान, मनसे सोबत आल्यावर महायुतीचा कार्यक्रम कसा असेल हे ठरवलं जाणार आहे. त्यामुळे हॉटेल ताज लँडमध्ये होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मनसेने महायुतीकडे दोन जागांची मागणी केली आहे. आता महायुतीकडून त्यांना या जागा दिल्या जातात का?, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

News Title –  Chandrasekhar Bawankule big statement on Raj Thackeray

 महत्वाच्या बातम्या- 

‘…सुजल्याशिवाय सुधरणार नाहीत ही बेनी’, अभिनेते किरण मानेंचा महायुतीला टोला

बारामतीत युगेंद्र पवारांना अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी घेरलं!

उद्या होणार IPL 2024 हंगामाला सुरवात! पाहा 21 सामन्यांचे वेळापत्रक

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

पुणेकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा!