“…तर शिंदेंच्या एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Anna Bansode | निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आता जागा वाटप संदर्भात तयारीला लागले आहेत. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत होता तो सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामुळे. येथे नणंद आणि भावजयमध्ये थेट लढत होणार आहे.

मात्र, आता बारामतीमध्ये सध्या शिंदे गटाच्या आमदाराचीच अधिक चर्चा होऊ लागली आहे. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात जणू एल्गारच पुकारलाय. शिंदे गटात असलेले माजी आमदार विजय शिवतारे बारामतीची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जवळपास जाहीरच केलं आहे.

शिवतारेंच्या बंडाविरोधात अजित पवार गट आक्रमक

शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांचं चांगलंच टेंशन वाढलं आहे. कारण, अजित पवार यांच्याच गटातील आमदाराने मोठी भूमिका घेतल्याने हा वाद अजूनच चिघळला आहे. शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांचा गट करणार नाही, अशी भूमिकाच आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी घेतली आहे.

त्यामुळे महायुतीत बारामतीवरुन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवतारे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अजित पवार गटातील नेत्यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांची राष्ट्रवादी करणार नाही, अशी भूमिका पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.

अण्णा बनसोडे यांचा गंभीर इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज देऊन शिवतारे ऐकत नसतील तर आम्ही जिथं शिंदे गटाचे उमेदवार असतील तिथं प्रचार करणार नाही, असं अण्णा बनसोडे म्हणाले आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात तिढा निर्माण होऊ शकतो.

दरम्यान, विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी घोषित केल्याने हा वाद वाढला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. तर, पुण्याला गेल्यावर पुढची दिशा ठरवणार. बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात खूप रोष आहे. त्यामुळे येथे त्यांचा विजय अशक्यच असल्याचं देखील शिवतारे यांनी म्हटलं होतं. आता अजित पवार गटातीलच नेत्याने कठोर भूमिका घेतल्याने याचा परिणाम महायुतीवर होऊ शकतो.

News Title- Anna Bansode warning to the Shinde group over Rebellion of Shivtare

महत्त्वाच्या बातम्या –

‘फडणवीसांनी मला पहाटे तीन वाजता…’; जरांगे पाटलांकडून मोठा गौप्यस्फोट

ए आर रहमानच्या तालावर चाहते नाचणार, IPL च्या मैदानात हे तारे रंगणार

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!; एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र

डोळ्यांखाली Dark Circles दिसत आहेत? मग या घरगुती टिप्स फॉलो करा

आयपीएलमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर! पाहा टीमचे शिलेदार