चेन्नईची धुरा मराठी माणसाच्या हातात…. ‘हा’ युवा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार

CSK Captain Ruturaj Gaikwad l आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामासाठी सीएसकेने संघाची कमानऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. म्हणजेच एमएस धोनी यंदाच्या मोसमात चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार नाही. चेन्नईला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करावा लागणार आहे.

CSK Captain Ruturaj Gaikwad l ऋतुराज सांभाळणार CSK च्या संघाची कमान :

आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामासाठी CSK ने ऋतुराज गायकवाडला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. एमएस धोनी या हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गेल्या मोसमात अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

माहीच्या नेतृत्वाखाली सीएसकेची कामगिरी उत्कृष्ट :

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी उत्कृष्ट होती. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. धोनी 2008 पासून संघाचे नेतृत्व करत आहे. 2022 मध्ये, सीएसकेने हंगाम सुरू होण्यापूर्वी रवींद्र जडेजाकडे संघाची कमान सोपवली. मात्र, जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आणि मोसमाच्या मध्यात धोनीची पुन्हा कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

CSK Captain Ruturaj Gaikwad l ऋतुराजची कामगिरी उत्कृष्ट :

रुतुराज गायकवाडची चेन्नई सुपर किंग्जसाठी गेल्या काही मोसमातील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. गेल्या मोसमात रुतुराजने 16 सामन्यात 147 च्या स्ट्राईक रेटने 590 धावा केल्या होत्या. ऋतुराजने चार अर्धशतके झळकावली होती. त्याचवेळी आयपीएल 2022 मध्ये सलामीच्या फलंदाजाने 14 सामन्यांमध्ये 368 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता.

News Title : CSK Captain Ruturaj Gaikwad

महत्त्वाच्या बातम्या –

ए आर रहमानच्या तालावर चाहते नाचणार, IPL च्या मैदानात हे तारे रंगणार

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!; एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र

डोळ्यांखाली Dark Circles दिसत आहेत? मग या घरगुती टिप्स फॉलो करा

आयपीएलमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर! पाहा टीमचे शिलेदार

‘शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील’; पवार कुटुंबातील व्यक्तीच्या वक्तव्याने खळबळ