सर्वात मोठी बातमी! ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशीत योग्य ती उत्तरे न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. आता अरविंद केजरीवाल यांना ईडी कार्यालयात घेऊन जाणार आहेत. त्यानंतर पुढे तिथे त्यांची चौकशी होणार आहे.

अरविंद केजरीवालांना अटक

याआधी ईडीकडून त्यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आल होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे. या प्रकरणातील ही 16 वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती.

दारुविक्री घोटाळा नेमका काय आहे?

सरकारने 2021-22 साली दारुविक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं होतं. सरकारी महामंडळांऐवजी दारु विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना देण्यात आले होते. दिल्लीतल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारु वितरणाची जबाबदारी दिली. केजरीवाल सरकारने म्हटलं की, नव्या धोरणाने दारुचा काळाबाजार थांबला. नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढही झाली. मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे. याच प्रकरणी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाली होती. ते अजूनही जेलमध्येच आहेत. याशिवाय अनेक मोठ्या नेत्यांना या प्रकरणात याआधीही अटक करण्यात आली आहे.

आज ईडीचे पथक दहावे समन्स घेऊन त्यांच्या घरी दाखल झाली होती. यावेळी त्यांच्यी घरी झडती देखील घेण्यात आली आहे. चौकशीदरम्यान केजरीवाल यांचा फोन देखील ईडीने ताब्यात घेतला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय ईडीकडून गेल्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात येत आहे. याआधी झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली होती. पण हेमंत सोरेन यांनी अटकेआधी राजीनामा दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

‘पुष्पा 2’ मधील रश्मिकाचा लूक समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

सर्वात मोठी बातमी! रामदास आठवलेंच्या गाडीला भीषण अपघात

रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक; एका दगडात दोन पक्षी मारले

“24 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये…” ; मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा