रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक; एका दगडात दोन पक्षी मारले

Rohit Pawar | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. राज्यामध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी 20 जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये आता मनसे पक्ष महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा राज ठाकरे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत आहेत.

राज्यामध्ये भाजपने पक्ष फोडल्यानंतर छोट्या पक्षांना एकत्रित सोबत घेत आपलंस करण्याचा प्रयत्न करत आहेत. तामिळनाडूमध्येही भाजपने विजयासाठी छोट्या 6 पक्षाला सोबत घेतलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्वीट करत हल्ला चढवला आहे.

रोहित पवार यांचं ट्वीट

“आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजप आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे 40-40 आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही तर दुसरीकडे 1-1 आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरतोय”, असं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्वीटद्वारे भाजपवर हल्ला चढवला आहे.

त्यानंतर त्यांनी पुढे ट्वीटमध्ये लिहिलं की, “असला शाही पाहुणचार बघून छोटे पक्ष मनातले मांडे खात असले तरी ‘उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे’ या भाजपच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात. असो! या छोट्या पक्षांकडे बघून अल्पावधीतच आधीच शिकार झालेले मोठे पक्ष नया है वह असेच म्हणत असतील,” असं ट्वीट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये यावं अशी ऑफर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरे यांना दिली होती. मात्र आता राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे मनसे आणि भाजपच्या युतीवरून राज ठाकरे यांना रोहित पवार यांनी घेरलं.

मनसेचा दोन जागांवर दावा

राज ठाकरे यांनी अमित शहा यांच्यासोबत भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी महायुतीसोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये नाशिक, शिर्डी किंवा मुंबईच्या जागेवर मनसेनं दावा केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला आलेल्या जागांमधून दोन जागा मनसेला देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

News Title – Rohit Pawar Tweet On MNS Will join Mahayuti

महत्त्वाच्या बातम्या

‘फडणवीसांनी मला पहाटे तीन वाजता…’; जरांगे पाटलांकडून मोठा गौप्यस्फोट

ए आर रहमानच्या तालावर चाहते नाचणार, IPL च्या मैदानात हे तारे रंगणार

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!; एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र

डोळ्यांखाली Dark Circles दिसत आहेत? मग या घरगुती टिप्स फॉलो करा

आयपीएलमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर! पाहा टीमचे शिलेदार