अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | लोकसभा  निवडणूक तोंडावर असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली आहे. दोन तास चौकशी झाल्यानंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे. या प्रकरणातील ही 16 वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं आहे. अशात केजरीवांलांच्या संपत्तीचा आकडा आला समोर.

अरविंद केजरीवाल यांची संपत्ती किती?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याकडे एकूण 3.44 कोटींची संपत्ती आहे. केजरीवाल यांच्याकडे केवळ 12 हजार रुपये तर पत्नीकडे केवळ 9 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांच्या कुटुंबाची 6 बँक खाती आहेत ज्यामध्ये 33.29 लाख रुपये जमा आहेत.

2020 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रा त्यांनी ही माहिती दिली आहे. 15.31 लाख रुपये पत्नीच्या नावावर म्युच्युअल फंडात जमा आहेत. केजरीवाल यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. मात्र त्यांच्या पत्नीच्या नावावर 6.20 लाख रुपयांची मारुती बलेनो आहे.

दारुविक्री घोटाळा नेमका काय आहे?

सरकारने 2021-22 साली दारुविक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं होतं. सरकारी महामंडळांऐवजी दारु विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना देण्यात आले होते. दिल्लीतल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारु वितरणाची जबाबदारी दिली. केजरीवाल सरकारने म्हटलं की, नव्या धोरणाने दारुचा काळाबाजार थांबला. नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढही झाली. मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे. याच प्रकरणी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाली होती. ते अजूनही जेलमध्येच आहेत. याशिवाय अनेक मोठ्या नेत्यांना या प्रकरणात याआधीही अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक

अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

‘पुष्पा 2’ मधील रश्मिकाचा लूक समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

सर्वात मोठी बातमी! रामदास आठवलेंच्या गाडीला भीषण अपघात

रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक; एका दगडात दोन पक्षी मारले