Eknath Shinde |आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब असा उल्लेख केला होता. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समाचार घेतला आहे. वरळी डोम येथे पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती, त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले.
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
“पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं म्हणजे हा देशाचा अपमान आहे. हा देशद्रोह आहे”, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की ,”खरा औरंगजेब तो ज्याने बापाला सोडलं नाही, भावाला सोडलं नाही. त्याने आपल्या कुटुंबाला सोडलं नाही. हिच वृत्ती महाराष्ट्राने पाहिली त्याचं उत्तर मतपेटीतून महाराष्ट्र देईल”, असा घणाघात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.
“मोदींच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल”
“मोदींच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांच्या साथीने कलम 370 हटवलं. जे स्वप्नवत वाटत होतं. शेपटी असलेल्या प्राण्यांचे त्यांना फोटो काढायला आवडत होते. म्हणून वेळेप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीत लोटांगणं घालणारे, वेळप्रसंगी घाम फुटणारे हे कोण आहेत? मुख्यमंत्री पदासाठी, सत्तेसाठी, कोणी शेपूट घातली हे जनतेनं पाहिलं आहे,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी घणाघात केला.
“राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. यापुढेही होईल. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल. समविचारी पक्षांची युती आणि कामावरचा विश्वास पाहून अनेकजण आमच्यासोबत येतात. राज्यामध्ये 48 जागा आहेत. त्यात 45 हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ताकद लावायची आहे”.
“…तोच काळा दिवस”
“शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे मार्गदर्शन करायचे. त्याठिकाणी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना आणण्यात आलं तोच काळा दिवस होता”, असं म्हणत एकनाथ शिंदे कडाडले आहेत. “इंडिया आघाडी बिखरली आहे. उद्धव ठाकरे यांना घरी बसण्याची सवय आहे. जनता त्यांना घरीच बसवणार आहे,” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र डागलं आहे.
आगामी लोकसभा तोंडावर आहे. यापार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना देखील धारेवर धरलं.
News Title – Eknath Shinde Aggressive On Uddhav Thackeray And sanjay raut
महत्त्वाच्या बातम्या
अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!
‘पुष्पा 2’ मधील रश्मिकाचा लूक समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
सर्वात मोठी बातमी! रामदास आठवलेंच्या गाडीला भीषण अपघात
रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक; एका दगडात दोन पक्षी मारले
“24 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये…” ; मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा