कोहलीला ‘विराट’ विक्रमासाठी फक्त 6 धावांची गरज; असं करणारा ठरणार पहिला भारतीय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | आजपासून आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होत आहे. CSK आणि RCB यांच्यात सलामीचा सामना खेळवला जात आहे. या मोसमातील पहिला सामना शुक्रवारी चेन्नईत होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB vs CSK) अनुभवी खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) या सामन्यात एक खास विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे. किंग कोहली ट्वेंटी-20 मध्ये 12000 धावांचा आकडा गाठू शकतो. यासाठी त्याला फक्त 6 धावांची गरज आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. (RCB vs CSK Match Updates)

विराट कोहलीने आतापर्यंत 376 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये 11994 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 8 शतके आणि 91 अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीला 12 हजार ट्वेंटी-20 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्याने असे केल्यास 12 हजार ट्वेंटी-20 धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल.

आजपासून IPL चा थरार

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहली ही कामगिरी करू शकतो. कोहलीनंतर रोहित शर्मा भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ट्वेंटी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिजच्या गेलने 463 सामन्यात 14562 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 22 शतके आणि 88 अर्धशतके झळकावली आहेत. शोएब मलिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 542 सामन्यांमध्ये 13360 धावा केल्या आहेत. या यादीत किरॉन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 660 सामन्यांमध्ये 12900 धावा केल्या आहेत. तर ॲलेक्स हेल्स चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 12319 धावा केल्या आहेत.

Virat Kohli ला सुवर्णसंधी

विराट कोहलीचा आयपीएलमध्ये उत्कृष्ट विक्रम आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 237 सामन्यांमध्ये 7263 धावा केल्या आहेत. कोहलीने या स्पर्धेत 7 शतके आणि 50 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 113 धावा आहे. शेवटचा मोसमही कोहलीसाठी चांगलाच होता.

आयपीएलच्या मागील हंगामात विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली होती. पण गुजरात टायटन्सने पराभूत करून आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले होते. विराटने मागील हंगामात 14 सामन्यात 639 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली. आता कोहली पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे.

News Title- Virat Kohli has a chance to set a record in the very first match of IPL 2024
महत्त्वाच्या बातम्या –

आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, ‘या’ दोन संघांमध्ये पहिली लढत

महेंद्रसिंग धोनीसाठी रोहित शर्माची पोस्ट, क्रिकेटच्या वर्तुळात तुफान चर्चा

…अन् मराठमोळा ऋतुराज झाला CSK चा कर्णधार; वाचा धोनीची दूरदृष्टी!

होळीला रंग खेळा? पण त्वचेची अशाप्रकारे काळजी घ्या

रोहित पवारांच्या जीवाला धोका; सुप्रिया सुळेंनी केली मोठी मागणी