रोहित पवारांच्या जीवाला धोका; सुप्रिया सुळेंनी केली मोठी मागणी

Supriya Sule | शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्याबाबत थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्राद्वारे मोठी मागणी केली आहे. त्यामुळे राजकारणात याची जोरदार चर्चा रंगली आहेत.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांना (पुणे ग्रामीण) पत्र लिहिलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी पत्रात काय म्हटलं?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पद्धतीने, शांतपणे आणि लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु, काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक त्यांना घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली आहे. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे, असं त्यांनी म्हटलंय.

रोहित आणि युगेंद्र पवारांचा आवाज दाबण्याची ही कृती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडणं शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची आणि गंभीर बाब आहे. सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही, असंही ते म्हणालेत.

रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका

आपणाकडून (पोलीस अधीक्षक) रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरवण्यात यावी, ही विनंती आहे. आपण याबाबत विनाविलंब कार्यवाही कराल, असा विश्वास आहे, अशा आशयाचं पत्र सुप्रिया सुळे यांनी लिहिलं आहे.

आता सुळे यांच्या पत्रानंतर रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा दिली जाणार का, याबाबत चर्चा होत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच सुप्रिया सुळे यांचं पत्र चर्चेत आलं आहे.

News Title- Security should be provided to Rohit Pawar Supriya Sule demand

महत्त्वाच्या बातम्या –

पुणे मेट्रोचं काम अडलं!,विस्तारित प्रकल्पांचं काम करण्यासाठी दोन संस्थांमध्ये चढाओढ

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वसंत मोरेंनी केली मोठी घोषणा!

संजय राऊतांची मोदींवर टीका, एकनाथ शिंदे भडकले, राऊतांना झापलं…

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!

सर्वात मोठी बातमी! ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक