पुणे मेट्रोचं काम अडलं!,विस्तारित प्रकल्पांचं काम करण्यासाठी दोन संस्थांमध्ये चढाओढ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि स्वारगेट ते पुलगेटदरम्यानचा विस्तारित मेट्रो प्रकल्प ‘खासगी भागीदारी तत्त्वावर’ (पीपीपी) राबविणे योग्य होईल, असा अहवाल सल्लागार कंपनीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दिला आहे.

आता हाच अहवाल ‘पुम्टा’ची मान्यता घेऊन राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. मात्र, या मार्गांचं काम करण्यासाठी महामेट्रोही पुढे आली आहे. महामेट्रोही यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे नेमकं हे काम कुणाला दिलं जाईल, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

पीएमआरडीएकडून टाटा समूहासोबत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचं काम सध्या ‘खासगी भागीदारी तत्त्वावर’ म्हणजेच पीपीपी तत्वावर सुरू आहे. या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार शिवाजीनगर ते लोणीकाळभोर आणि रेसकोर्स ते स्वारगेट करण्याचे नियोजन अगोदरच ठरवलेलं आहे.

विस्तारित प्रकल्पांचं काम करण्यासाठी चढाओढ

या मार्गांचा प्रकल्प विकास आराखडा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून पीएमआरडीएने तयार करून घेतला होता. तर दुसरीकडे महामेट्रोचा खडकवासला ते खराडी हा मार्ग अद्याप प्रस्तावित आहे. त्यात खडकवासला ते स्वारगेट, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि हडपसर ते लोणी काळभोर (Pune News ) या टप्प्यांचा समावेश आहे.

महामेट्रोने या मार्गाचा प्रकल्प विकास आराखडा खासगी सल्लागार संस्थेकडून तयार करून घेतला होता. त्यामुळे या दोन्ही संस्थांनी महापालिकेकडे हे प्रकल्प विकास आराखडे सादर केले होते. आता झालं असं की, पीएमआरडीए आणि महामेट्रो यांच्याकडून दोन समान मार्गांवर मेट्रो उभारणीचे प्रकल्प विकास आराखडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे एकच संस्था या मार्गांचे काम करेल हे निश्चित करण्यात आलं.

पीएमआरडीए आणि महामेट्रो यांच्यात चढाओढ

आता हे मार्ग फायदेशीर ठरणार की नाही, हे बघण्यासाठी पीएमआरडीएने सल्लागार नेमला आहे. या संदर्भातील अहवाल हा पीएमआरडीएकडून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणासमोर (पुम्टा) नुकताच सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा विस्तारित मार्ग कोण करणार, याबाबतचा निर्णय हा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पुम्टा घेणार आहे.

दरम्यान, पीएमआरडीए आणि महामेट्रोनेही (Pune News ) या मार्गांचा विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे प्रकल्पांचं काम करण्यासाठी कुणाची निवड केली जाईल, याबाबत निर्णय पुम्टा घेण्याची शक्यता आहे.

News Title- Pune News Competition between PMRDA and Mahametro to carry out expanded metro project

महत्त्वाच्या बातम्या –

संजय राऊतांची मोदींवर टीका, एकनाथ शिंदे भडकले, राऊतांना झापलं…

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!

सर्वात मोठी बातमी! ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक

अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

‘पुष्पा 2’ मधील रश्मिकाचा लूक समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला