अभिनेता रणदीप हुड्डाचा अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या रायबद्दल मोठा खुलासा!

Randeep Hooda | बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचं तो सध्या जोरदार प्रदर्शन करत आहे. यानिमित्तच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणदीपने अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत मोठा खुलासा केला.

या दोघांनी ‘सरबजीत’चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. चित्रपटात ऐश्वर्याने रणदीप याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यावेळी त्याने ऐश्वर्यासोबत काम करताना आलेला अनुभव सांगितला आहे. त्यामुळे सध्या ऐश्वर्या आणि रणदीप यांच्याबद्दल चर्चा होत आहेत.

रणदीप हुड्डाचा ऐश्वर्याबाबत मोठा खुलासा

“ऐश्वर्या खूप नम्र आणि चांगली व्यक्ती आहे. तिनं तिचं काम प्रामाणिकपणे पूर्ण केलं. स्वतःची भूमिका प्रामाणिकपणे साकारण्याचा तिने पूर्ण प्रयत्न केला. सेटवर आमची भेट फार कमी झाली कारण सीन वेगळे शूट करण्यात आले होते. पण जेव्हा आम्ही भेटलो आहोत, तेव्हा ऐश्वर्यासोबत गप्पा व्हायच्या.”, असा खुलासा रणदीपने मुलाखतीमध्ये केला.

रणदीप पुढे म्हणाला की, “ऐश्वर्याच्या लुकवर या चित्रपटात खूप काम करण्यात आलं. तिने स्वतःदेखील यासाठी खूप मेहनत घेतली. तिने पूर्ण इमानदारीने आपली भूमिका साकारली.” यावेळी सरबजीतच्या कुटुंबासोबतच्या त्याच्या बाँडिंगबद्दलही रणदीप हुड्डा (Randeep Hooda) मनमोकळेपणाने बोलला.

रणदीप हुड्डा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ मध्ये दिसणार

जेव्हा आम्ही चित्रपट बनवत होतो, तेव्हा मी ऐश्वर्यापेक्षा सरबजीतच्या बहिणीशी जास्त बॉन्डिंग केले होते. त्या आता या जगात नाहीत. मात्र त्यांच्या चितेला मी अग्नी द्यावी, अशी त्यांची शेवटची इच्छा होती. त्यांची ही इच्छा मी पूर्ण केली. त्या एक उत्कृष्ट महिला होत्या. त्यांनी खरंच सरबजीतच्या मुलांची काळजी घेतली. आता ते चांगले सेटल झाले आहेत. मी अजूनही त्यांच्या संपर्कात आहे, असं रणदीप म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)

दरम्यान, स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आज (22 मार्च) प्रदर्शित होत आहे. यात अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda ) याने वीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

News Title- Randeep Hooda big revelation about Aishwarya Rai

महत्त्वाच्या बातम्या –

महेंद्रसिंग धोनीसाठी रोहित शर्माची पोस्ट, क्रिकेटच्या वर्तुळात तुफान चर्चा

…अन् मराठमोळा ऋतुराज झाला CSK चा कर्णधार; वाचा धोनीची दूरदृष्टी!

होळीला रंग खेळा? पण त्वचेची अशाप्रकारे काळजी घ्या

रोहित पवारांच्या जीवाला धोका; सुप्रिया सुळेंनी केली मोठी मागणी

ED मध्ये नोकरी कशी मिळवाल? पात्रता व किती पगार मिळतो?