रामराजे निंबाळकरांचा गर्भित इशारा, भाजपचं टेंशन वाढलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ranjitsingh Naik Nimbalkar | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये विरोधक आणि सत्ताधारी सभा घेताना दिसत आहेत. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. माढा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsingh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी दिल्याने सोलापूरचे भाजपचे नेते धैर्य़शील मोहिते-पाटील नाराज झाले आहेत.

भाजप नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsingh Naik Nimbalkar) यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsingh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी देऊ नका, असा सल्ला आता अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. रणजितसिंहने माझी माफी मागावी असं ते फलटणच्या मेळाव्याला संबोधित करत असताना म्हणाले आहेत.

रामराजे नाईक निंबाळकर आक्रमक

रामराजे नाईक निंबाळकर यांचा फलटणमध्ये (21 मार्च) मेळावा होता. या मेळाव्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह यांना धारेवर धरलं आहे. माढा मतदारसंघातून रणजितसिंह यांना उमेदवारी मिळाली त्यावर त्यांनी रणजितसिंहला सुनावलं आहे. भाजपने कोणालाही उमेदवारी द्यावी पण रणजितसिंहला (ranjitsingh Naik Nimbalkar) उमेदवारी देऊ नये, अशी रामराजे नाईक निंबाळकर यांनी भूमिका मांडली आहे.

रामराजे यांच्याकडून खंत व्यक्त

त्यानंतर रामराजे यांनी रणजितसिंह यांच्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर रणजितसिंह यांनी साधा एक फोनही केला नसल्याने रामराजे यांनी खंत व्यक्त केली. रणजितसिंहच्या उमेदवारीवर त्यांनी दंड थोपटले आहेत. हा केवळ फलटणचा प्रश्न नसून माण-खटावचा देखील प्रश्न आहे असं ते मेळाव्यामध्ये म्हणाले.

“अजितदादा म्हणाले की कार्यकर्त्यांशी बोलून बघा. त्यांना शांत करा. माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला आहे ते फायनल आहे. जे जे बोलले आहेत ते नेत्यांनी ऑलरेडी मीडियाने पोहोचवले आहे. केवळ हा फलटणचा प्रश्न नाही तर हा माण-खटावचा देखील प्रश्न आहे. हे आपण अजित पवार यांना बोलून दाखवलं आहे. तरी त्यांना भाजपचा उमेदवार पाहिजे आहे. उद्या कमी मतदान झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही”, असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले आहेत.

त्यानंतर त्यांनी निरा देवघरविषयी भाष्य केलं. निरा देवघरसाठी रात्री तीन-तीन वाजता पुनर्वसनाच्या बैठकी घेतल्या, म्हणून निरा देवघरचा प्रश्न मिटला असून खंडाळ्याला 66 किमीपर्यंत पाणी गेलं असल्याचा दावा रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे.

Ranjitsingh Naik Nimbalkar vs Ramraje Naik Nimbalkar 

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

‘पुष्पा 2’ मधील रश्मिकाचा लूक समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

सर्वात मोठी बातमी! रामदास आठवलेंच्या गाडीला भीषण अपघात

रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक; एका दगडात दोन पक्षी मारले

“24 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये…” ; मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा