…अन् मराठमोळा ऋतुराज झाला CSK चा कर्णधार; वाचा धोनीची दूरदृष्टी!

MS Dhoni | आयपीएलचा सतरावा हंगाम अर्थात IPL 2024 ला आजपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या संघ व्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेत ऋतुराज गायकवाडवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाने सांगितले की, महेंद्रसिंग धोनी यापुढे आमचा कर्णधार राहणार नाही. ऋतुराज गायकवाड सीएसकेचा नवा कर्णधार असेल. मात्र महेंद्रसिंग धोनीने ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवण्याबाबत ज्या पद्धतीने भाष्य केले त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (Chennai Super Kings New Captain Ruturaj Gaikwad)

महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने पाचवेळा किताब जिंकला आहे. गुरुवारी सकाळी चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि व्यवस्थापन अधिकारी नाश्ता करत होते, त्यावेळी माहीने ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवण्याबाबत भाष्य केले. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला.

…अन् ऋतुराज झाला कर्णधार

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, ऋतुराज गायकवाडला गेल्या दोन वर्षांपासून कर्णधार म्हणून तयार केले जात आहे. मात्र, महेंद्रसिंग धोनीनंतर रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार बनवले जाऊ शकते, असे मानले जात होते. पण धोनीच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. धोनी मागील दोन वर्षांपासून कर्णधारपदासाठी ऋतुराजला तयार करत होता.

तसेच महेंद्रसिंग धोनी आणि संघ व्यवस्थापनाने ऋतुराज गायकवाडवर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला, असेही विश्वनाथ यांनी सांगितले. खरं तर आयपीएल 2022 च्या आधी चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजाला आपला कर्णधार बनवले होते, परंतु तो निर्णय योग्य ठरला नाही, त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने पुन्हा नेतृत्व स्वीकारले.

MS Dhoni चा मोठा निर्णय

मराठमोळा ऋतुराज गायकवाड प्रथमच आयपीएलमध्ये चेन्नईचे कर्णधारपद भूषवत आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 52 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 135.52 च्या स्ट्राईक रेटने 1797 धावा केल्या आहेत. या खेळाडूच्या नावावर 1 शतक आहे.

याशिवाय ऋतुराज गायकवाडने 14 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडची आयपीएल सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या 101 आहे. याशिवाय ऋतुराज गायकवाडने 6 वन डे सामन्यांव्यतिरिक्त 19 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

News Title- On the eve of IPL 2024 ms dhoni made Ruturaj Gaikwad captain of csk
महत्त्वाच्या बातम्या –

होळीला रंग खेळा? पण त्वचेची अशाप्रकारे काळजी घ्या

रोहित पवारांच्या जीवाला धोका; सुप्रिया सुळेंनी केली मोठी मागणी

ED मध्ये नोकरी कशी मिळवाल? पात्रता व किती पगार मिळतो?

“फार काळजी करण्याची गरज…”, CSK चा कर्णधार ऋतुराजचं मोठं विधान!

केजरीवाल यांच्या अटकेनंतर शरद पवार यांचं भाजपवर टीकास्त्र, म्हणाले…