“फार काळजी करण्याची गरज…”, CSK चा कर्णधार ऋतुराजचं मोठं विधान!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ruturaj Gaikwad | आयपीएल 2024 ला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा देऊन ही जबाबदारी मराठमोळ्या खेळाडूवर सोपवली. गुरुवारी संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेत महेंद्रसिंग धोनीच्या जागी सलामीवीर फलंदाजाकडे संघाचे नेतृत्व दिले. आता संघाच्या नव्या कर्णधाराने यावर प्रतिक्रिया दिली आहे. कर्णधारपद मिळताच ऋतुराजने आनंद व्यक्त केला असून ही मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.

चेन्नईच्या संघाची धुरा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. त्याने 2019 मध्ये सीएसकेसाठी पदार्पण केले होते. आतापर्यंत खेळलेल्या 52 सामन्यांमध्ये या स्टार खेळाडूने 135.52 च्या स्ट्राईक रेटने 1797 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याच्या नावावर एक शतक आणि 14 अर्धशतकांची नोंद आहे. आज चेन्नई आणि आरसीबी यांच्यात सलामीचा सामना होत आहे.

ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या 17व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर सीएसके आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत आठ सामने झाले आहेत. यामध्ये गतविजेत्या चेन्नईच्या संघाने सर्वाधिक सात सामने जिंकले आहेत तर आरसीबीने केवळ एकच सामना जिंकला आहे.

त्यामुळे आज आपली विजयी परपंरा कायम ठेवण्याचे आव्हान ऋतुराजच्या संघासमोर असेल. चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून कर्णधार ऋतुराज गायकवाडचे विधान शेअर केले आहे. यामध्ये त्याने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तो म्हणाला की, चांगले वाटत आहे… साहजिकच ही अभिमानाची बाब आहे. शिवाय ही एक मोठी जबाबदारी आहे पण आमच्याकडे ज्या प्रकारचा संघ आहे, ते पाहता मी खूप उत्साहित आहे. प्रत्येकजण अनुभवी आहे आणि त्यामुळे फार काळजी करण्यासारखे काही नाही.

 

Ruturaj Gaikwad नवा कर्णधार

तसेच माझ्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे माही (धोनी) भाई मला रस्ता दाखवण्यासाठी माझ्या संघात आहे. जड्डू (जडेजा) देखील एक आहे, अज्जू (रहाणे) देखील आहे, जो एक चांगला कर्णधार आहे. काळजी करण्याची फारशी गरज नाही, खेळाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहे, असेही नवनिर्वाचित कर्णधार ऋतुराज गायकवाडने म्हटले.

ऋतुराजने 2019 मध्ये सीएसकेसाठी पदार्पण केले. आतापर्यंत खेळलेल्या 52 सामन्यांमध्ये या स्टार खेळाडूने 135.52 च्या स्ट्राईक रेटने 1797 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याच्या नावावर एक शतक आणि 14 अर्धशतकांची नोंद आहे. गेल्या हंगामात त्याने CSK साठी 16 सामन्यात 590 धावा केल्या होत्या. चेन्नईला आयपीएल 2023 मध्ये विजेतेपद मिळवून देण्यात या युवा खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणारा सातवा खेळाडू आहे.

News Title- Ruturaj Gaikwad has become the new captain of CSK and he says it is a matter of pride
महत्त्वाच्या बातम्या –

शरद पवारांचा डाव उलटवण्यासाठी अजित पवारांची नवी खेळी!

पुणे मेट्रोचं काम अडलं!,विस्तारित प्रकल्पांचं काम करण्यासाठी दोन संस्थांमध्ये चढाओढ

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वसंत मोरेंनी केली मोठी घोषणा!

संजय राऊतांची मोदींवर टीका, एकनाथ शिंदे भडकले, राऊतांना झापलं…

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!