केजरीवाल यांच्या अटकेनंतर शरद पवार यांचं भाजपवर टीकास्त्र, म्हणाले…

Arvind Kejriwal Arrested | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. राज्याच्या नाहीतर देशाच्या राजकारणामध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. राज्यामध्ये ईडीच्या भितीने विरोधक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Arrested) यांना रात्री अटक करण्यात आली होती.

ईडीने तब्बल 9 वेळा समन्स बजावलं आहे. त्यानंतर त्यांची काल सायंकाळी चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना थेट अटक करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भाजप पक्षावर देशभरातून टीका केली जात आहे. अशातच आता शरद पवार यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. (Arvind Kejriwal Arrested)

शरद पवारांची भाजपवर टीका

“निवडणुका जवळ आल्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्याचा जाहीर तीव्र निषेध. भाजप सत्तेसाठी अजून किती झुकणार हे या अटकेवरून दिसून आलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधामध्ये इंडिया अघाडी एकजुटीने उभी आहे”. (Arvind Kejriwal Arrested)

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अटक

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक केली. ही त्यांची 16 वी अटक आहे. काल रात्री ईडीची टीम ही सायंकाळी 7 वाजता अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Arrested) यांच्या घरी पोहोचली. आता त्यांना अटक करण्यात आली.

दिल्ली सरकारने 2021-22 साली दारूविक्रीबाबत नवीन धोरण बनवलं. सरकारी महामंडळाऐवजी दारू विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना देण्यात आलं. दिल्लीतल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारू वितरणाची जबाबदारी दिली. यामुळे नव्या धोरणाने दारूचा काळाबाजार थांबला.

नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या नव्या महसुलात मोठी वाढ झाली. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे. याप्रकरणामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष ससोदिया तुरूंगात आहे.

News Title – Arvind Kejriwal Arrested On Sharad Pawar Statement Against BJP

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांची मोदींवर टीका, एकनाथ शिंदे भडकले, राऊतांना झापलं…

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!

सर्वात मोठी बातमी! ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक

अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

‘पुष्पा 2’ मधील रश्मिकाचा लूक समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला