महेंद्रसिंग धोनीसाठी रोहित शर्माची पोस्ट, क्रिकेटच्या वर्तुळात तुफान चर्चा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल 2024 चा हंगाम आजपासून (22 मार्च) सुरू होत आहे. सलामीचा सामना चेन्नई चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. चेन्नईमधील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये रात्री 8 वाजता हा सामना रंगणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच महेंद्रसिंह धोनीने चाहत्यांना मोठा धक्का दिला.

धोनीने (Mahendra Singh Dhoni) चेन्नईचं कर्णधारपद सोडलं आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये चेन्नईची कमान युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्याकडे असणार आहे. धोनीच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर फक्त धोनीच्या या निर्णयाचीच चर्चा रंगली. धोनीच्या या निर्णयावर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

महेंद्रसिंग धोनीसाठी रोहित शर्माची पोस्ट

रोहित शर्माने धोनीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यंदा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि महेंद्रसिंह धोनी दोघेही नेतृत्वाच्या जबाबदारीविना मैदानात उतरणार आहेत. रोहित आणि धोनी यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली संघाना (IPL 2024) पाचवेळा ट्रॉफी जिंकवून दिली आहे. आयपीएलला एक दिवस शिल्लक असताना ऋतुराजची निवड झाल्याने चाहते नाराज झाले आहेत.

अशातच रोहित शर्मा याने धोनीसाठी केलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. रोहितने धोनीचा आणि त्याचा टॉस उडवतानाचा फोटो इन्स्टा स्टोरीला ठेवला आहे. त्याच्या या फोटोवर चाहते अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. त्याची ही स्टोरी खूप लाईक केली जात आहे.

रोहित आणि धोनी नेतृत्वाच्या जबाबदारीविना खेळणार

रोहित शर्माकडे मुंबईची कॅप्टनी 2013 पासून होती. तर धोनी सुरूवातीपासूनच सीएसकेचा कर्णधार राहिला होता. मात्र, 2022 मध्ये धोनीने कर्णधारपद सोडलं होतं. यानंतर रवींद्र जडेजाकडे संघाची जबाबदारी देण्यात आली होती. पण, संघाला यश मिळत नसल्याने अवघ्या आठ सामन्यानंतर जडेजाने कर्णधारपद सोडलं होतं.

यानंतर धोनी 2023 (IPL 2024) मध्ये पुन्हा कर्णधार झाला होता. त्याने 2023 मध्ये संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. यावर्षी त्याने कर्णधार पद सोडलं आहे. तर, दुसरीकडे रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे.

News Title- IPL 2024 Rohit Sharma post for Mahendra Singh Dhoni

महत्त्वाच्या बातम्या –

संजय राऊतांची मोदींवर टीका, एकनाथ शिंदे भडकले, राऊतांना झापलं…

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!

सर्वात मोठी बातमी! ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक

अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

‘पुष्पा 2’ मधील रश्मिकाचा लूक समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला