आजपासून सुरु होणार IPL 2024 चा रणसंग्राम! आज होणार CSK Vs RCB लढत

IPL Opening Ceremony Live Streaming l आयपीएल 2024 आजपासून सुरू होत आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने येणार आहेत. त्याचबरोबर या सामन्यापूर्वी रंगतदार उद्घाटन सोहळा होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि एआर रहमान सारखे दिग्गज आपली जादू दाखवणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी रंगारंग उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

IPL Opening Ceremony Live Streaming l प्रेक्षकांना Jio सिनेमावर 12 भाषांमध्ये सामना पाहता येणार? :

तुम्ही जिओ सिनेमावर आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, चाहत्यांना Jio सिनेमावर 12 भाषांमध्ये मजा घेता येणार आहे. यासाठी चाहत्यांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार नाही. चाहत्यांना हा कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार आहे. याशिवाय तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या रंगतदार उद्घाटन सोहळ्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे.

या दोन संघात होणार लढत? : चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

कधी होणार सामना : आज (22 मार्च 2024)

किती वाजता रंगणार सामना : भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता

मोबाईलवर कुठे पाहता येईल सामना ? : Jio सिनेमा

टीव्हीवर कुठे पाहता येईल सामना : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

News Title- IPL Opening Ceremony Live Streaming

महत्त्वाच्या बातम्या –

होळी रे होळी पुरणाची पोळी! जाणून घ्या शुभ मुहूर्त

रामराजे निंबाळकरांचा गर्भित इशारा, भाजपचं टेंशन वाढलं

अभिनेता रणदीप हुड्डाचा अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या रायबद्दल मोठा खुलासा!

कोहलीला ‘विराट’ विक्रमासाठी फक्त 6 धावांची गरज; असं करणारा ठरणार पहिला भारतीय

आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, ‘या’ दोन संघांमध्ये पहिली लढत