Xiaomi Civi 4 Pro या दिवशी बाजारात करणार एंट्री; मिळणार जबरदस्त फीचर्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Xiaomi Civi 4 Pro l Xiaomi कंपनीचे भारतात तसेच जगभरात लाखो वापरकर्ते आहेत. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फोन सतत अपग्रेड करत असते. अशातच कंपनीने नवीन Xiaomi Civi 4 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन गुरुवारी 21 मार्च रोजी चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये Leica सपोर्टसह 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi Civi 4 Pro l Xiaomi Civi 4 Pro किंमत काय असणार? :

– हा फोन चीनमध्ये तीन स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत अंदाजे 34,600 रुपये आहे.

– तर त्याच्या 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत अंदाजे 38,100 रुपये आहे आणि 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत अंदाजे 41,500 रुपये आहे.

– हा फोन सध्या Xiaomi चायना ई-स्टोअरवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे 26 मार्चपासून चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध केले जाईल.

– Xiaomi Civi 4 Pro हा ब्रीझ ब्लू, सॉफ्ट मिस्ट पिंक, स्प्रिंग वाइल्ड ग्रीन आणि स्टाररी ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.

Xiaomi Civi 4 Pro चे स्पेसिफिकेशन काय असणार? :

डिस्प्ले – Xiaomi Civi 4 Pro मध्ये 6.55-इंच 1.5K OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 3,000 nits पीक ब्राइटनेस लेव्हल आणि गोरिला ग्लास 2 संरक्षण आहे.

प्रोसेसर- या फोनसोबत तुम्हाला Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर मिळेल, ज्यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.0 ऑनबोर्ड स्टोरेज आहे.

कॅमेरा- Xiaomi Civi 4 Pro वर Leica च्या सपोर्टसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह 50MP प्राथमिक सेन्सर, 50MP सेन्सर आणि 12MP सेन्सर आहे. फोनच्या पुढील बाजूस दोन 32-मेगापिक्सल सेन्सर आहेत.

बॅटरी- यात 4,700mAh बॅटरी आहे जी 67W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

News Title- Xiaomi Civi 4 Pro

महत्त्वाच्या बातम्या –

आजपासून सुरु होणार IPL 2024 चा रणसंग्राम! आज होणार CSK Vs RCB लढत

IPL 2024 ची 5 वैशिष्ट्ये! विविध कारणांनी यंदाचं पर्व गाजणार, वाचा सविस्तर

होळी रे होळी पुरणाची पोळी! जाणून घ्या शुभ मुहूर्त

रामराजे निंबाळकरांचा गर्भित इशारा, भाजपचं टेंशन वाढलं

अभिनेता रणदीप हुड्डाचा अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या रायबद्दल मोठा खुलासा!