‘एक दिवस शमी माझ्यामागून…’; अभिनेत्री वंदना गुप्तेंनी सांगितला भन्नाट किस्सा

Vandana Gupte | मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांचं नाव उंचीवर आहे. त्यांनी अनेक मराठी मालिका, मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. नुकताच ‘बाईपण भारी देवा’, नावाचा चित्रपट येऊन गेला त्या चित्रपटाने 50 कोटीहून अधिक कमाई केली. त्या चित्रपटामध्ये वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी काम केलं होतं. यामुळे त्या मधल्या काळामध्ये अधिक चर्चेत आल्या होत्या.

पुन्हा एकदा वंदना गुप्ते एका वेगळ्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. लोकमतच्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये वंदना गुप्ते (Vandana Gupte) आपल्या बहीणीसोबत उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं दिली. या मुलाखतीच्या वेळी वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला होता.

“त्यांच्या चिठ्ठ्या पोहोचवण्याचं काम मी केलं”

“शर्मिलाचे बाबा मोहन वाघ यांच्यासोबत मी नाटकामध्ये काम करायची. तेव्हा शर्मिला आणि मी अनेकदा धमाल केली होती. मी राज आणि शर्मिलाला जवळून पाहिलं आहे. मी त्यांच्या चिठ्ठ्या पोहोचवण्याचं काम केलं आहे,” असं वंदना गुप्ते म्हणाल्या आहेत.

शर्मिला ठाकरे यांच्या वडीलांचा किस्सा

“मोहन काकाचं म्हणजेच तिच्या बाबाचं तिच्यावर बारीक लक्ष होतं. ती कुठे जाते ती काय करते हे त्यांना माहिती असायचं. मोठ्या बहीणीवर विश्वास होता पण शर्मिलावर नव्हता”, असं वंदना गुप्ता म्हणाल्या. “एक दिवस शमी माझ्यामागून माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली ‘मी तुझ्यासोबत होते हा…’, त्यावेळी पुढे मोहन वाघ काका होते. त्यांनी विचारलं कुठे होता?, म्हणाले कॉफी प्यायला,” असा किस्सा वंदना गुप्ते यांनी सांगितला.

“आमची मैत्री आजही टिकून आहे. राजला हे सर्व माहिती आहे. मी आणि शर्मिला आम्ही शिवाजीपार्कला शेजारी शेजारी राहतो. त्यामुळे आमचं सतत भेटणं होतं,”

वंदना गुप्ते यांनी बाईपण भारी देवा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. काही दिवसांआधी झालेल्या झी गौरव चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

News Title – Vandana Gupte Share Coincidence Of Raj Thackeray And Sharmila Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांचा डाव उलटवण्यासाठी अजित पवारांची नवी खेळी!

पुणे मेट्रोचं काम अडलं!,विस्तारित प्रकल्पांचं काम करण्यासाठी दोन संस्थांमध्ये चढाओढ

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वसंत मोरेंनी केली मोठी घोषणा!

संजय राऊतांची मोदींवर टीका, एकनाथ शिंदे भडकले, राऊतांना झापलं…

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!