SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

SBI net banking l तुमचेही SBI खाते असेल तर तुमच्यासाठी एक मह्त्वाची बातमी आहे. एसबीआयने आपल्या करोडो बँक खातेधारकांना मोठा धक्का दिला आहे. उद्या म्हणजेच 23 मार्च रोजी SBI च्या सर्व इंटरनेट सेवा बंद राहणार आहेत. SBI ग्राहक नियोजित क्रियाकलापांमुळे इंटरनेट बँकिंग सेवा वापरू शकणार नाहीत. एसबीआयने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. देशात SBI चे तब्बल 44 कोटी ग्राहक आहेत, ज्यांना याचा फटका बसणार आहे. उद्या तुम्हाला कोणत्या सेवा वापरता येणार नाहीत ते जाणून घेऊयात…

SBI net banking l YONO ॲपसह या सेवा बंद राहणार :

SBI वेबसाइटनुसार, इंटरनेट बँकिंग ॲप्लिकेशन, YONO, YONO Lite, YONO Business Web यासह सर्व ॲप्स उद्या 23 मार्च रोजी एक तासासाठी बंद असणार आहेत. याशिवाय या कालावधीत कोणताही ग्राहक इंटरनेट बँकिंग वापरू शकणार नाही. नियोजित क्रियाकलापांमुळे 23 मार्च रोजी 01:10 ते 02:10 पर्यंत इंटरनेट सेवा कार्य करणार नाहीत. मूलभूत सेवांसाठी व्हॉट्सॲप बँकिंगच्या सेवांचा लाभ घेता येईल.

अशा प्रकारे काम केले जाईल :

याशिवाय, तुम्ही SBI च्या टोल फ्री क्रमांकांवर कॉल करू शकता. 1800 1234 आणि 1800 2100 बँकिंग संबंधित कामासाठी आणि SBI संपर्क केंद्राद्वारे सेवा मिळवू शकता.

SBI net banking l कोणत्या गोष्टी चालतील? :

या काळात तुम्हाला पैशांची गरज असल्यास तुम्ही UPI द्वारे पैशांचा व्यवहार करू शकता. याशिवाय तुम्ही एटीएममधूनही पैसे काढू शकता. UPI लाइट वापरकर्त्यांना लिंक केलेल्या बँक खात्यातून नव्हे तर ‘ऑन-डिव्हाइस’ वॉलेट वापरून व्यवहार करण्याची परवानगी देते. याचा अर्थ असा की तुम्ही बँकेतून न जाता फक्त वॉलेट वापरून शक्य तितक्या लवकर पेमेंट करू शकाल.

News Title-  SBI net banking, mobile app, YONO to be down on this day

महत्त्वाच्या बातम्या –