‘मोदी घाबरट हुकूमशहा’; केजरीवालांच्या अटकेवरून राहुल गांधी संतापले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rahul Gandhi | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना काल (21 मार्च) ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशीत योग्य ती उत्तरे न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

इंडिया आघाडीतील नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. कॉँग्रेस खासदार राहुल गांधीही यावर आपला संताप व्यक्त करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदी घाबरट हुकूमशहा” असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

एक घाबरलेला हुकूमशाह मृत लोकशाही बनवण्याच्या प्रयत्नात आहे. माध्यमांसह सर्व संस्था काबीज करणं, पक्ष फोडणं, कंपन्यांकडून हप्तेवसुली करणं, प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवणं हे त्या ‘असुरी शक्ती’साठी कमी होतं, म्हणून आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं त्यांच्यासाठी खूप साधी गोष्ट झाली आहे. इंडिया याला तोडीचं उत्तर देणार! असं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांची गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून चौकशी करण्यात येत होती. ईडीने त्यांना 9 वेळा समन्स बजावलं होतं. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. त्यांना अटक होणार याची खात्री होती. त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र,अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

केजरिवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीत तीव्र पडसाद

केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपच्या कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. दिल्लीत याचे तीव्र पडसाद दिसून आले. या प्रकरणी आंदोलन केल्यामुळे दिल्ली पोलिसांनी मंत्री सौरभ भारद्वाज यांना अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती खन्ना यांच्या खंडपीठात होणार आहे.

हे प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ठेवण्यात आले होते. त्यावर CJI म्हणाले की, न्यायमूर्ती खन्ना यांच्या खंडपीठाकडे जावे. सर्वोच्च न्यायालयाचे तीन सदस्यीय खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.अभिषेक मनु सिंघवी केजरीवाल यांची बाजू मांडणार आहेत.

News Title- Rahul Gandhi Slams Narendra Modi Over Arvind Kejriwal Ed Arrest

महत्त्वाच्या बातम्या –

पुणे मेट्रोचं काम अडलं!,विस्तारित प्रकल्पांचं काम करण्यासाठी दोन संस्थांमध्ये चढाओढ

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वसंत मोरेंनी केली मोठी घोषणा!

संजय राऊतांची मोदींवर टीका, एकनाथ शिंदे भडकले, राऊतांना झापलं…

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!

सर्वात मोठी बातमी! ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक