शिवरायांची तुलना राज ठाकरेंशी?; अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर नेटकरी भडकले

Tejaswini Pandit Tweet | आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. याकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. देशासह राज्यात देखील अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यात महायुतीमध्ये मनसे पक्ष देखील सामिल होणार असल्याची चिन्हे आहेत. अशातच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं एक ट्वीट (Tejaswini Pandit Tweet) केलं आहे. त्या ट्वीटमध्ये (Tejaswini Pandit Tweet) तिनं “पुरंदरचा तह…. पण राजा वर विश्वास…कायम !!”, अशा आशयाचं ट्वीट तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit Tweet) केलं. त्यामध्ये पुरंदरच्या तहाचे देखील विश्लेषण करण्यात आलं होतं.

तेजस्विनी पंडित नेहमी तिच्या वक्तव्यासाठी चर्चेत असते. तिनं आता सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामुळे ती आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे. (Tejaswini Pandit Tweet)

आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. भेटीमध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं. त्यानंतर राज ठाकरे दिल्लीवरून मुंबईकडे परतले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

अशातच आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्या ट्वीटमध्ये तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली असा आरोप नेटकऱ्यांनी केला असून सध्या नेटकरी तेजस्विनी पंडितवर भडकले आहेत.

काय होतं ट्वीट

”या तहामुळे स्वराज्याचे तात्कालिक नुकसान नक्कीच झाले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेबाकडून कैद देखील झाली होती पण हा तह करताना शिवाजी महाराजांनी बरीच मोठी दूरदृष्टी दाखवली होती. जे २३ किल्ले तहामध्ये द्यायचे ठरले होते ते मुळतः मोगलांचेच किल्ले होते. तोरणा, राजगड, शिवनेरी सारखे महत्त्वाचे किल्ले शिवाजी महाराजांना राखून ठेवण्यात यश आले होते. या तहामुळे सामान्य जनतेचे होणारे हाल थांबले होते. आग्रा येथील कैदेतून सुटल्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी परत एक एक किल्ला जिंकण्यास सुरुवात केली. हा तह १३ जून १६६५ रोजी झाला होता. आणि तह झाल्यानंतर महाराजांकडे १२ किल्ले उरले होते. पण पुढील १५ वर्षात म्हणजेच १६८० पर्यंत शिवाजी महाराजांकडे तब्बल २०० किल्ले होते. हा तह जेवढा ऐतिहासिक आहे तेवढाच सामान्य माणसाला प्रेरणादायी पण आहे. बरेच वेळेस प्रचंड संघर्ष करून यशाचे शिखर गाठल्यावर तिथूनही माघार घेण्याची वेळ आयुष्यात अनेक जणावर येते पण अशी वेळ आल्यावर खचून न जाता परत कसे उभा राहायचे हे शिवाजी महाराजांकडून आणि या तहातून शिकायला मिळते. काही वेळेस स्वीकारलेली तात्कालिक माघार दूरदृष्टीचा विचार करता किती महत्त्वाची असते ही गोष्ट पण पुरंदरचा तह शिकवतो. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे तो याच कारणामुळे. या तहाच्या मूळ प्रती आजही राजस्थानातील बिकानेर येथील संग्रहालयात उपलब्ध आहेत.” असं ट्वीट तेजस्विनी पंडितनं केलं आहे.

नेटकरी संतापले

तेजस्विनी पंडितने केलेल्या ट्वीटवर नेटकरी संतापले आहेत. “नाही पटलं…तुलना कोणासोबत?” “तह नाही याला नांगी टाकणं म्हणतात.”

“अहो ताई तुमच्या साहेबांच्या राजकारणाला आमच्या राज्याच्या निर्णय सोबत compare करू नका कुठे ते 1-2 लोकसभा जागेसाठी दिल्लीपुढे लोटांगण घालणारे तुमचे साहेब आणि कुठे शिवछत्रपती” अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे.

News Title – Tejaswini Pandit Tweet Raj Thackeray Compare With Chatrapati Shivaji Maharaj

महत्त्वाच्या बातम्या 

आजपासून सुरु होणार IPL 2024 चा रणसंग्राम! आज होणार CSK Vs RCB लढत

IPL 2024 ची 5 वैशिष्ट्ये! विविध कारणांनी यंदाचं पर्व गाजणार, वाचा सविस्तर

होळी रे होळी पुरणाची पोळी! जाणून घ्या शुभ मुहूर्त

रामराजे निंबाळकरांचा गर्भित इशारा, भाजपचं टेंशन वाढलं

अभिनेता रणदीप हुड्डाचा अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या रायबद्दल मोठा खुलासा!