होळीच्या दिवशी ‘लुसलुशीत पुरणपोळी’ बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Puran Poli recipe | ‘होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबच्या खिशात बंदुकीची गोळी’, होळीच्या दिवशी हे वाक्य ऐकूनच आपण लहानाचे मोठे झालो. लहानपणी रंगपंचमी वा धुळवड खेळल्यानंतर पुरणपोळी खाण्याची एक वेगळीच मज्जा असते.

होळीच्या दिवसही प्रत्येक घरात हमखास पुराणपोळी बनवली जाते. तुम्हीही जर पुरणपोळी बनवण्याचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी काही टिप्स आहेत. या टिप्स फॉलो केल्या तर तुमचीही पुरणपोळी ही मस्त खमंग आणि लुसलुशीत होईल.

पुरणपोळी बनवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

पुरणपोळी बनवताना डाळ व्यवस्थित शिजवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण, संपूर्ण पदार्थ हा डाळीवरच अवलंबून असतो. त्यामुळे डाळ शिजल्यानंतर त्यातले पाणी संपूर्ण काढून घ्यावे. गूळ मिसळल्यानंतर हे मिश्रण पातळ होते. तेव्हा ते चांगले शिजवून घ्या, जेणेकरून त्यातील पाणी आटेल.

पुरणामध्ये (Puran Poli recipe) एखादा झाऱ्या किंवा चमचा उभा ठेवल्यास तो स्थिर राहील, तोपर्यंत डाळ शिजवावी. तसंच पुरणपोळीची चव वाढवण्यासाठी त्यात जायफळ पावडर घालावी. आता पुरणपोळीसाथी आपण कणिक कशी घेतोय, तेही महत्वाचं असतं. त्यामुळे पूर्ण[पोळीसाठी घेतलेली कणिक चांगली बारीक असावी, त्यासाठी ती चाळून घ्या आणि मऊसूत कणिक होईपर्यंत ती मळा. कणिक मळून झाल्यावर अर्धा तास भिजू द्यावी. या सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हीही स्वादिष्ट आणि खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेऊ शकता.

पुरणपोळी बनवण्याची पद्धत

पुरणपोळी बनवण्यासाठी अगोदर चणा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून 3 तास भिजत ठेवा. नंतर प्रेशर कुकर किंवा इतर पातेल्यामध्ये, कढईमध्ये पाणी घालून, त्यात 1/4 चमचा हळद, एक चमचा तेल आणि किंचित मीठ घालून डाळ शिजवून घ्या. वर सांगितल्याप्रमाणे डाळमधील पूर्ण पाणी आटलं पाहिजे. कुकरमध्ये डाळ टाकली असेल तर, 5 शिट्ट्या होऊ द्या. यानंतर गॅस बंद करा.

डाळ शिजून थंड झाल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे. आता डाळ वाटून घ्या. त्यानंतर कढईत डाळीचे वाटण आणि गूळ घालून दोन्ही मिक्स करा. गूळ वितळेपर्यंत दोन्ही चांगले मिसळा. त्यात जायफळ पावडर आणि वेलची पावडर घालून मिक्स करा. यानंतर, गॅस बंद करून सारण थंड होऊ द्या.

सारण तयार झाल्यानंतर पीठ (Puran Poli recipe) मळून घ्या. यासाठी पिठात हवी असल्यास हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळताना त्यात एक चमचा तेल घाला म्हणजे पीठ मऊ होईल. मळून झाल्यानंतर 15 मिनिटे पीठ बाजूला ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर पीठ घेऊन परत एकदा मळून घ्या आणि समान प्रमाणात गोळे तयार करा.

नंतर एक-एक पिठाचा गोळा घेऊन पुरीच्या आकाराचा रोल करा. त्यानंतर तयार पुरण मध्यभागी ठेवा. पुरण भरल्यावर कणकेचा गोळा बंद करा. यानंतर दोन्ही तळहातांमध्ये ठेवून ते सपाट करा आणि सामान लाटून घ्या. मध्यम आचेवर पुरण पोळी टाकून भाजून घ्या. त्यात तूप लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.नंतर पुरणपोळीला तूप लावून सर्व्ह करा. तुमची लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे.

News Title : Puran Poli recipe

महत्त्वाच्या बातम्या-

आजपासून सुरु होणार IPL 2024 चा रणसंग्राम! आज होणार CSK Vs RCB लढत

IPL 2024 ची 5 वैशिष्ट्ये! विविध कारणांनी यंदाचं पर्व गाजणार, वाचा सविस्तर

होळी रे होळी पुरणाची पोळी! जाणून घ्या शुभ मुहूर्त

रामराजे निंबाळकरांचा गर्भित इशारा, भाजपचं टेंशन वाढलं

अभिनेता रणदीप हुड्डाचा अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या रायबद्दल मोठा खुलासा!