“वेळ आली तर मी…”, विजय शिवतारे ‘या’ पक्षातून लढणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Shivtare | आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आहे. मतदारसंघातील निवडणुकीच्या तारखा देखील समोर आल्या आहेत. सर्वांचं लक्ष हे बारामती मतदारसंघाकडे लागलं आहे. सुप्रिया सुळेंविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी दंड थोपटले आहेत. बारामती मतदासंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा दावा विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला.

पुन्हा एकदा त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. ते काही दिवस झालं बारामती मतदारसंघामध्ये फिरत आहेत. बारामती मतदारसंघाचा कल हा शिवसेनेकडे असल्याचं ते म्हणाले आहेत. तर वेळप्रसंगी मी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवेल, असा निर्धार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला.

“कमळावर लढेल पण लढेल”

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण होणार आहे. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये आता आणखी एकाने दावा केला आहे. विजय शिवतारे गेली अनेक दिवसांपासून बारामती मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यावर एकशे एक टक्के इच्छुक आहेत. यामुळे आता अजितदादांचं टेन्शन वाढलं आहे. विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे कमळावर बारामतीची जागा लढण्यास तयार झाले आहेत.

“15-20 दिवस झालो मी बारामती मतदारसंघामध्ये फिरत आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. कमळावर लढायला मी तयार आहे. अपक्ष लढणं हा नंतरचा भाग आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

“वेळ आली तर भाजपसोबत बोलेल”

“मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. मी नेत्यांना कमळावर लढण्याचा निर्णय दिला आहे. अपक्ष निवडणूक लढण्यापेक्षा ते चांगलं. मुख्यमंत्र्यांनी ही सीट महायुतीमध्ये मागून घ्यावी. याबाबत मी भाजपच्या नेत्यांशी कशी चर्चा करू. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करेल, पण वेळ आली तर मी भाजपसोबत बोलेल,” असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

“सुप्रिया सुळे यांना फायदा होईल”

“मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. शंभुराज देसाईंना भेटलो. त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना बारामती मतदारसंघाची सीट महायुतीमध्ये आपल्या बाजूने घ्या अशी मागणी केली. सुनेत्रा पवार कोणत्याही पद्धतीने निवडून येणार नाहीत. सुप्रिया सुळे यांना फायदा होईल. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी आपले दुश्मन तयार केले आहेत,” असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

News Title – Vijay Shivtare Get Big Disicison About Baramati Lok sabha BJP Symbol

महत्त्वाच्या बातम्या

शिवरायांची तुलना राज ठाकरेंशी?; अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर नेटकरी भडकले

‘मोदी घाबरट हुकूमशहा’; केजरीवालांच्या अटकेवरून राहुल गांधी संतापले

काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर

आजपासून सुरु होणार IPL 2024 चा रणसंग्राम! आज होणार CSK Vs RCB लढत

IPL 2024 ची 5 वैशिष्ट्ये! विविध कारणांनी यंदाचं पर्व गाजणार, वाचा सविस्तर