भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळालं तिकीट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP Candidate Fourth List | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची चौथी यादी (BJP Candidate Fourth List) जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राज्यातील एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं. तसेच चौथ्या यादीमध्ये देखील राज्यातील एकाही उमेदवाराचं नाव नाही. या चौथ्या यादीमध्ये तमिळनाडूच्या अभिनेत्रीला तिकीट देण्यात आलं आहे. (BJP Candidate Fourth List)

तमिळनाडूच्या अभिनेत्रीला उमेदवारी

या चौथ्या यादीमध्ये (BJP Candidate Fourth List) एकूण 14 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये तमिळनाडूतील अभिनेत्री राधिका सरथकुमारला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राधिका सरथकुमार या विरूदनगर येथून निवडणूक लढवणार आहे. (BJP Candidate Fourth List)

भाजपची तिसरी यादी जाहीर

भाजपची तिसरी यादी 21 मार्च रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी तिसऱ्या यादीमध्ये एकूण 9 उमेदवारांचा समावेश होता. यामध्ये भाजप नेते आण्णामलाई यांचा समावेश आहे. आण्णामलाई हे कोईंबतूर येथून निवडणूक लढवणार आहे. तसेच या तिसऱ्या यादीमध्ये तमिळनाडू मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे.

दुसऱ्या यादीमध्ये 72 जणांची नावे

भाजपची लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या यादीमध्ये 72 जणांची नावे आहेत. म्हणजेच दुसऱ्या यादीमध्ये 72 मतदरासंघाचा समावेश आहे.  ज्या मतदारसंघामध्ये कोणता वाद नाही. तसेच अशा मतदरासंघामध्ये मित्रपक्षाचा दावा नाही, अशाच उमेदवारांची भाजपकडून घोषणा करण्यात आली आहे.

2 मार्चला लोकसभा मतदारसंघाची पहिली यादी जाहीर झाली. या मतदारसंघामध्ये 195 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये 34 मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली. तर 28 महिला नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 20 जागांसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील दिग्गज भाजप नेते नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीत नव्हतं.

News Title – BJP Candidate Fourth List News update

महत्त्वाच्या बातम्या

“मफलरवाला आत गेला आता लवकरच…”, नितेश राणेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

“वेळ आली तर मी…”, विजय शिवतारे ‘या’ पक्षातून लढणार?

होळीच्या दिवशी ‘लुसलुशीत पुरणपोळी’ बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

‘एक दिवस शमी माझ्यामागून…’; अभिनेत्री वंदना गुप्तेंनी सांगितला भन्नाट किस्सा