लवासा प्रकरणी मोठी अपडेट समोर!; ईडीची मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Lavasa City | दिवाळखोरीत निघालेल्या लवासा (Pune Lavasa City) प्रकल्पाप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोरी आली आहे. लवासा प्रकल्प (Pune Lavasa City) अजय सिंग यांच्या डार्विन कंपनीने विकत घेतला होता. मात्र आता ईडीने डार्विन कंपनीवर मोठी कारवाई केलीय. ईडीच्या दिल्ली विभागीय कार्यालयाकडून अजय सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 78 लाखांची रोकड आणि २ लाख रकमेची विदेशी रोकड जप्त करण्यात आली.

लवासा प्रकल्प पुन्हा चर्चेत

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात लवासा प्रकल्प (Pune Lavasa City) उभारण्यात आला आहे. 12 हजार 500 एकर जमिनीवर देशातील पहिला खासगी हिल स्टेशन उभारण्यात आले. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून उभारण्यात येणारा हा प्रकल्प अडचणीत आला. त्यानंतर हा प्रकल्प घेण्यासाठी डार्विन कंपनी पुढे आली होती.

डार्विन ग्रुपवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर लवासा प्रकल्प (Pune Lavasa City) पुन्हा चर्चेत आला आहे. परंतु डार्विन ग्रुपमुळे बँक आणि घरे घेणाऱ्यांना भरपाई मिळणार आहे.

‘या’ लोकांना भरपाई देण्यात येणार

या प्रकल्पाचा व्यवहार झाल्यानंतर डार्विन ग्रुप आठ वर्षात 1 हजार 814 कोटी रुपयांची भरपाई बँक आणि घरे घेणाऱ्यांना देणार आहे. बँकांची 929 कोटी रुपये थकबाकी आहे. तसेच घर खरेदी करणाऱ्या लोकांना 438 कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.

वेस्टिज मार्केटिंगच्या तक्रारीवरून चौकशी केली असता डलेमनचे संचालक हे बोगस असल्याचं समोर आलं. त्यानुसार ईडीने डलेमन रिया-आयटी ट्रेड लिमिटेड या कंपनीवर छापेमारी केली आहे. ही कंपनी कायदेशील ऑडिटींग आणि कर सल्लागार क्षेत्रात काम करते.

ईडीचा दावा

डलेमन आणि इतर वेस्टिंग मार्केटींग कंपनीच्या बँक खात्यातून 18 कोटी रूपये वळती केल्याचा आरोप आहे. ही रक्कम डलेमनच्या बँक खात्यातून डार्विन ग्रुप कंपनीच्या अनेक बँक खात्यांमधून अजय सिंहच्या जवळच्या सहाकाऱ्याच्या बँक खात्यामध्ये वळवण्यात आल्याचा ईडीने दावा केला आहे.

News Title – Pune Lavasa City Ed News Update

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळालं तिकीट

“मफलरवाला आत गेला आता लवकरच…”, नितेश राणेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

“वेळ आली तर मी…”, विजय शिवतारे ‘या’ पक्षातून लढणार?

होळीच्या दिवशी ‘लुसलुशीत पुरणपोळी’ बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!