IPL 2024: कोहलीच्या संघाचं पुन्हा एकदा जुनंच रडगाणं, पहिल्या सामन्याचा आला निकाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024: आयपीएलच्या १७ व्या मोसमाची चेन्नईत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात सुरुवात झाली. यंदाच्या मोसमाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (CSKvRCB) यांच्यात पार पडला. घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला आहे.

नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी-

बंगळुरुने नाणेफेक जिंकली होती आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरुच्या फलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवला आणि चेन्नईविरुद्ध(CSKvRCB) २० षटकांमध्ये १७३ धावांची धावसंख्या उभारली.

बंगळुरुकडून अनूज रावतने (Anuj Rawat) २५ चेंडूंमध्ये ४८ धावांची स्फोटक खेळी केली. याशिवाय दिनेश कार्तिकने २६ चेंडूत ३८ आणि कर्णधार फाफने २३ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. चेन्नईकडून मुस्तफिजूर रेहमानने २९ धावा देत ४ बळी घेतले.

CSKvRCB: चेन्नईनं असा जिंकला सामना

१७४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) तशी ही धावसंख्या आव्हानात्मक होती, मात्र घरचं मैदान आणि चांगली फलंदाजांची फळी यामुळे चेन्नईला हे आव्हान फारसं जड जाणवलं नाही. ठरावित अंतराने विकेट पडत होत्या, मात्र चेन्नई कधीच फारशी बॅकफूटवर गेल्याचं जाणवलं नाही. अखेर ८ चेंडू बाकी ठेवून चेन्नईने आयपीएल २०२४ मोसमाचा पहिला सामना आपल्या खिशात घातला.

चेन्नईकडून रचिन रवींद्रने (Rachin Ravindra) सर्वाधिक धावा केल्या, त्याने १५ चेंडूत ३७ धावा केल्या. हा त्याचा आयपीएलमधला पहिलाच सामना होता. त्याच्याशिवाय शिवम दुबेने २८ चेंडूत ३४ धावा तर मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने १९ चेंडूत २७ धावांची खेळी केली.

बंगळुरुच्या फलंदाजांची चांगली धावसंख्या उभारली होती, मात्र बंगळुरुच्या गोलंदाजांचा या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. चेन्नईवर कुठल्याही क्षणी या सामन्याचं दडपण जाणवलं नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमाची सुरुवात पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खराब ठरली.

नव्या कर्णधाराचा आत्मविश्वास वाढणार-

पहिला सामना चेन्नईने (Chennai) खिश्यात घातला असला तरी हा विजय चेन्नईसाठी यामुळे महत्त्वाचा आहे की चेन्नई या मोसमात महेंद्रसिंग धोनीच्या(MS Dhoni) नव्हे तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वात खेळत आहे. धोनी यंदा आहे, मात्र भविष्याच्या दृष्टीने कर्णधाराची निवड करण्यात आली आहे, हा विजय नक्कीच नव्या कर्णधाराचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे.

News Title: ipl 2024 CSK v RCB match update

महत्त्वाच्या बातम्या-

जीवनात ‘या’ गोष्टी केल्या तर यश तुमच्या पायाशी लोळेल

लवासा प्रकरणी मोठी अपडेट समोर!; ईडीची मोठी कारवाई

भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळालं तिकीट

“मफलरवाला आत गेला आता लवकरच…”, नितेश राणेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

“वेळ आली तर मी…”, विजय शिवतारे ‘या’ पक्षातून लढणार?