विराट कोहलीचं पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | आयपीएल 2024 चा पहिला सामना काल (22 मार्च)चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात झाला. पहिल्याच सामन्यात चेन्नईने बंगळुरूला धूळ चारली. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यात 6 विकेट्सने मोठा विजय नोंदविला. मुस्तफिझूर रहमान हा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 4 विकेट्स घेत आरसीबीच्या फलंदाजांना माघारी पाठवलं.

मात्र, या सामन्यात चेन्नईच्या विजयासोबतच चर्चा होत आहे ती किंग कोहली म्हणजेच विराट कोहलीची. त्याने भर मैदानात असं काही कृत्य केलंय, ज्यामुळे तो सोशल मिडियावर ट्रोल होत आहे. विराटचा हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर आरसीबी संघाने चेन्नईसमोर विजयासाठी 174 धावांचं लक्ष्य ठेवलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना सीएसकेने 7 व्या षटकापर्यंत धावसंख्या 70 च्या पुढे नेली होती. यावेळी रचिन रवींद्र शानदार फलंदाजी करत होता. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हा पहिलाच सामना होता.

रचिनने 15 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 37 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याचा स्ट्राइक रेट 246.67 होता. 7 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रचिन आणखी एक मोठा शॉट खेळायला गेला तेव्हा त्याला रजत पाटीदारने झेलबाद केलं. रचिनची विकेट पडल्यानंतर आरसीबीने खूपच जल्लोष केला. तर, यावेळी विराट कोहली (Virat Kohli ) आक्रमक दिसला.

विराट कोहली सोशल मिडियावर ट्रोल

यादरम्यान विराट कोहलीने (Virat Kohli ) काही अपशब्दही वापरले, ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे विराटवर आता टीका केली जात आहे. त्याच्या या व्हिडिओवर सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने 35 आणि विराट कोहलीने 21 धावा करत संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. डुप्लेसिस बाद झाल्यानंतर आरसीबीला रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने दोन धक्के बसले. दोन्ही खेळाडू खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर युवा अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी धावा काढण्याची जबाबदारी स्वीकारली.

चेन्नईचा दणदणीत विजय

या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करून संघाला 174 पर्यंतची धावसंख्या गाठून दिली. रावतने 48 तर कार्तिकने 38 धावा केल्या. 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सीएसके संघालाही चांगली सुरुवात मिळाली.आयपीएल पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्रने 15 चेंडूत 37 धावा केल्या, तर कर्णधार रुतुराज गायकवाडने 15 धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणेने 27 धावांची आणि डॅरिल मिशेलने 22 धावांची छोटी पण प्रभावी खेळी खेळली.

तर दुबे आणि जडेजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी 66 धावांची नाबाद भागीदारी करून सीएसकेला विजय मिळवून दिला. जडेजाने 25 धावा तर दुबे 34 धावा करून नाबाद माघारी परतले.या जोडीने आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीतही चेन्नईला विजय मिळवून दिला होता.

News Title –  Virat Kohli rachin ravindra send off video viral

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीच्या नशिबी पुन्हा पराभव; विराटने मात्र 21 धावा करून रचला इतिहास

IPL 2024: कोहलीच्या संघाचं पुन्हा एकदा जुनंच रडगाणं, पहिल्या सामन्याचा आला निकाल

जीवनात ‘या’ गोष्टी केल्या तर यश तुमच्या पायाशी लोळेल

लवासा प्रकरणी मोठी अपडेट समोर!; ईडीची मोठी कारवाई

भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळालं तिकीट