भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मित्र पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाजप (Bjp) आणि बीजेडी युती संपुष्टात आली आहे. या दोन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशाचे भाजपच्या राज्य युनिट प्रमुख मनमोहन सामल यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप एकट्यानेच लढवणार आहे.

भाजपला मोठा धक्का

भाजप (Bjp) आणि बीजेडी यांच्यात जागावाटपाबाबत बोलणीही सुरु होती. मात्र, अचानक भाजपचे राज्यप्रमुख मनमोहन सामल यांनी भाजप स्वतंत्र निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केलं. त्यामुळे ही युती मोडल्यात जमा आहे.

बीजेडी स्वबळावर निवडणूक लढणार

भाजपने लोकसभेच्या 21 जागांपैकी 14 जागांवर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे बीजेडीला अवघ्या 7 जागांवर समाधान मानावे लागणार होते. तर, विधानसभेच्या 147 जागांपैकी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजेडीने 100 जागांची केलेली मागणी भाजपने फेटाळली. त्यामुळे जागावाटप निश्चित न झाल्यामुळे युतीची बोलणी फिस्कटली.

विधानसभा जागावाटपमध्ये बीजेडीला कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य नव्हती. हे ही युती तुटण्यामागील कारण आहे. ओडिशा राज्यात 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून या चार टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत.

बीजेडीला भुवनेश्वर आणि पुरी या दोन लोकसभा जागा हव्या होत्या. मात्र, या जागा भाजपलाही हव्या होत्या. मात्र भाजप आणि नवीन पटनायक यांच्यात जागावाटपावरून मतभेद निर्माण झाल्याने युतीच तोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

दरम्यान, निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीच्या घोषित झालेल्या या तारखा म्हणजे एक प्रकारे राजकीय युद्धच आहे. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा हा सामना होणार आहे. 18 व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी देशात 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

विराट कोहलीचं पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

वाघ अजून म्हातारा झालेला नाही!, पहिल्याच सामन्यात धोनीनं केलेली कमाल व्हायरल

आरसीबीच्या नशिबी पुन्हा पराभव; विराटने मात्र 21 धावा करून रचला इतिहास

IPL 2024: कोहलीच्या संघाचं पुन्हा एकदा जुनंच रडगाणं, पहिल्या सामन्याचा आला निकाल

जीवनात ‘या’ गोष्टी केल्या तर यश तुमच्या पायाशी लोळेल