रहाणे आणि रचीनचा अफलातून झेल, विराट बघतच राहिला; व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CSK v RCB | आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात (22 मार्च)झाला. चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फाफ डू प्लेसिसने विराट कोहलीसह फलंदाजीला सुरुवात केली.

मात्र, चेन्नईच्या वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानपुढे आरसीबीच्या खेळाडूंनी तर सपशेल गुडघेच टेकले. पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी जबरदस्त कामगिरी केली. या सामन्यातील विराट कोहलीची विकेट तर पाहण्यासारखीच होती. रहाणे आणि रचीन यांनी विराटची अफलातून विकेट घेतली. याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.

अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्रचा जबरदस्त झेल

मुस्तफिझूर रहमानने विराटला शॉर्ट-पिच बॉल टाकला. तो बॉल फ्लिक करत कोहलीने पुल शॉट मारला. चेंडू षटकारासाठी जाणार असं दिसत असतानाच बॉल हवेत गेला आणि डीप मिड-विकेटवर असलेला अजिंक्य रहाणे कॅच पकडण्यासाठी उजवीकडे धावत गेला आणि त्याने बॉल सहज पकडला.

पण, तो सीमारेषेवर पडणार हे त्याच्या लक्षात येताच त्याने बॉल हवेत फेकला. बॉल (CSK v RCB) येताना पाहून तिथून रचिन पण धावत आला आणि रहाणेने त्याच्या दिशेने बॉल फेकला आणि रचिनने तो बॉल पकडला. अजिंक्य रहाणे आणि रचीन रवींद्र यांच्या जबरदस्त कामगिरीने विराट पव्हेलियनमध्ये परतला. 35 वर्षीय रहाणेने फिल्डिंगमध्ये आपली जादू आणि फिटनेस दोन्हीची कमाल दाखवून दिली.

विराट कोहलीची अफलातून विकेट

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (CSK v RCB) प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाठी174 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान स्वीकारत चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकात 4 गडी गमवून विजय प्राप्त केला. या विजयासह चेन्नईने आपली स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरु केली.

या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात 2 गुणांची भर पडली आहे .चेन्नई सुपर किंग्सला दोन गुणांसह +0.779 रनरेट मिळाला आहे. तर बंगळुरुची हीच उलटी स्थिती असून -0.779 रनरेट आहे. आज आयपीएल हंगामचा दुसरा सामना आज (23 मार्च ) पंजाब विरुद्ध दिल्ली दुपारी 3:30 पासून खेळवला जाईल. तर, रात्री 7:30 वाजता कोलकाता विरुद्ध हैद्राबाद असा सामना होईल.

News Title – CSK v RCB Ajinkya Rahane Rachin Ravindra Catch Dismisses Virat Kohli

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीचं पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

वाघ अजून म्हातारा झालेला नाही!, पहिल्याच सामन्यात धोनीनं केलेली कमाल व्हायरल

आरसीबीच्या नशिबी पुन्हा पराभव; विराटने मात्र 21 धावा करून रचला इतिहास

IPL 2024: कोहलीच्या संघाचं पुन्हा एकदा जुनंच रडगाणं, पहिल्या सामन्याचा आला निकाल

जीवनात ‘या’ गोष्टी केल्या तर यश तुमच्या पायाशी लोळेल