शिंदे गटाला खिंडार?, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात जाण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shivajirao Adhalrao Patil | लोकसभा निवडणुक तोंडावर आली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी आज (23 मार्च)मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये शिरुरमधील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित राहणार आहेत.

याच बैठकीत शिवाजी आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याची राजकारणात चर्चा आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे.

शिवाजी आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार?

देवगिरी बंगल्यावर अजित पवारांनी अत्यंत महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीचं निमंत्रण शिवाजी आढळराव पाटील यांनाही देण्यात आलं असल्याची माहिती आहे. आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil ) यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याबाबत या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना चांगलाच धक्का बसणार असल्याचं बोललं जातंय.

शिवाजी आढळराव पाटील हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळालं नाही तर ते अजित पवार गटाच्या तिकीटावरही निवडणूक लढवण्यास तयार असल्याची चर्चा सुरु झाली. आता राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे आढळराव पाटील हे अजित पवारकडून लढायला तयार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिंदे गटाला खिंडार पडणार?

मात्र, यामुळे अजित पवार गटातील नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. आढळराव पाटील अजित पवार गटाकडून लढणार असल्याचं कळताच आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची अजित पवारांनी समजूत काढली आहे.

त्यामुळे आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil ) यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारं महायुतीत कुणी नसल्यामुळे आता ते घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आता याबाबत पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

News Title : Shivajirao Adhalrao Patil likely to join Ajit Pawar group

महत्त्वाच्या बातम्या-

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांना मोठा सल्ला; म्हणाले…

भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मित्र पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार

विराट कोहलीचं पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

वाघ अजून म्हातारा झालेला नाही!, पहिल्याच सामन्यात धोनीनं केलेली कमाल व्हायरल

आरसीबीच्या नशिबी पुन्हा पराभव; विराटने मात्र 21 धावा करून रचला इतिहास