KKR समोर हैदराबाद देणार आव्हान; जाणून घ्या दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11

KKR vs SRH Playing XI l आयपीएलच्या 17 व्या मोसमातील तिसऱ्या सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात KKR संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, जो मागील मोसमात पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे खेळू शकला नव्हता. तर सनरायझर्स हैदराबाद संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. KKR विरुद्ध SRH सामना भारतीय वेळेनुसार रात्री 08.00 वाजता सुरू होणार आहे.

गेल्या मोसमात KKR संघ हा सातव्या स्थानावर होता, तर SRH हा संघ शेवटच्या स्थानावर होता. अशातच आता या दोन्ही संघांनी त्यांच्या संघात मोठे बदल केले आहेत आणि काही दिग्गज खेळाडूंना त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. यामध्ये दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स नाइट रायडर्स आणि सनरायझर्समध्ये सामील झाले आहेत.

KKR vs SRH Playing XI l KKR Vs SRH खेळपट्टी कशी आहे? :

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात एक सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. कोलकाता नाईट रायडर्सला संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा लागणार आहे. केकेआरला घरच्या मैदानावर विजयाने सुरुवात करावी लागणार आहे. कोलकात्याच्या खेळपट्टीवर उच्च स्कोअरिंग सामने पाहायला मिळाले आहेत.

इडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर 200 हून अधिक धावसंख्याही बनवली आणि पाठलाग केला. तसेच केकेआरमध्ये गौतम गंभीरचा समावेश केल्याने गंभीरच्या कर्णधारपदाच्या काळात खेळपट्टीची रचना फिरकीच्या आधारे केली जाण्याची अपेक्षा आहे.

अशी असेल दोन्ही संघाची प्लेयिंग 11 :

कोलकाता नाईट रायडर्सचे संभाव्य प्लेइंग 11 –

रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.

सनरायझर्स हैदराबादचे संभाव्य प्लेइंग 11 –

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

New Title : KKR vs SRH Playing XI

महत्त्वाच्या बातम्या-

BMW कंपनीने लाँच केली जबरदस्त फीचर्ससह कार; किंमत ऐकून व्हाल थक्क

“यातच आपली कुवत कळते, फुकटचे सल्ले…”, किरण मानेंच्या टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

तब्बल 14 महिन्यांनी हा खेळाडू मैदान गाजवण्यास सज्ज! आज रंगणार PBKS vs DC

शिंदे गटाला खिंडार?, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात जाण्याची शक्यता

रहाणे आणि रचीनचा अफलातून झेल, विराट बघतच राहिला; व्हिडीओ व्हायरल